PM Kisan Yojana 22th Installment Date: पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.देशभरातील कोट्यवधी शेतकरी आता 22 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. पण त्यापूर्वी सरकारने काही नियमांमध्ये बदल केले आहेत.हे आवश्यक काम वेळेत पूर्ण केले नाहीत,तर पुढील 2000 रुपयांचा हप्ता खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे यावेळी शेतकऱ्यांनी सावध राहणे खूप गरजेचं आहे. पीएम किसान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची मदत दिली जाते.ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाते,ज्यात दर 4 महिन्यांनी 2000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातात.आतापर्यंत शेतकऱ्यांना 21 हप्त्यांचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे आता सर्वांना 22 व्या हफ्त्याची प्रतीक्षा लागली आहे.
पीएम किसानचा 22 वा हप्ता कधी मिळणार?
रिपोर्टनुसार, पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता फेब्रुवारी 2026 मध्ये जारी केला जाऊ शकतो. पण सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे PM Kisan च्या वेबसाइटवर सतत अपडेट्स तपासत राहा,जेणेकरून कोणतीही महत्त्वाची माहिती मिस होणार नाही.
PM Kisan योजनेतील सर्वात मोठा बदल
यावेळी युनिक Farmer ID संदर्भात सर्वात मोठा बदल करण्यात आला आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, आता फक्त e-KYC करून काम होणार नाही. ज्या शेतकऱ्यांकडे युनिक Farmer ID नसेल,त्यांचा पुढील हफ्ता थांबू शकतो. Farmer ID ही शेतकऱ्यांची डिजिटल ओळख मानली जात आहे.यामध्ये जमीनविषयक माहिती,पिकांचा डेटा,शेतीशी संबंधित माहिती आणि उत्पन्नाचा रेकॉर्ड जोडलेला असेल.योजनेचा फायदा फक्त पात्र शेतकऱ्यांनाच मिळावा आणि बोगस नावांवर मिळणारे हप्ते थांबवावेत. म्हणूनच फार्मर आयडीला पीएम किसान योजनेशी जोडले जात आहे.जर एखाद्या शेतकऱ्याने अद्याप Farmer ID बनवलेला नसेल, तर त्याचा 22 वा हफ्ता थांबू शकतो.
नक्की वाचा >> Raj Thackeray : "मुंबईतील बुलेट ट्रेन कुठून कुठे..",राज ठाकरेंनी मुंबई शहराचा भुगोलच काढला, नेमकं काय म्हणाले?
e-KYC कसे करावे?
e-KYC देखील PM Kisan योजनेसाठी अत्यंत आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजून e-KYC पूर्ण केलेली नाही, त्यांचे पैसेही रोखले जाऊ शकतात.
e-KYC करण्याचे मार्ग:
- PM Kisanची अधिकृत वेबसाइट
- येथे शेतकरी आपल्या मोबाइलवर OTP च्या मदतीने e-KYC करू शकतात.
- CSC केंद्रावर बायोमेट्रिक KYC
- जवळच्या CSC केंद्रात जाऊन अंगठ्याच्या बायोमेट्रिकद्वारे e-KYC पूर्ण करता येते.
- PM Kisan मोबाइल अॅपवर फेस ऑथेंटिकेशन
- सरकारने मोबाइल वापरकर्त्यांसाठी फेस ऑथेंटिकेशन सुविधा सुरू केली आहे.
- शेतकरी अॅप डाउनलोड करतात. लॉगिन करतात
- चेहरा स्कॅन करून e-KYC पूर्ण करू शकतात
- e-KYC पूर्ण केल्यानंतर अंदाजे 24 तासांच्या आत त्याची स्थिती (Status) पोर्टलवर दिसू लागते.
या कारणांमुळेही हफ्ता थांबू शकतो
कधी कधी शेतकऱ्यांचा हफ्ता फक्त e-KYC पूर्ण न झाल्यामुळेच थांबत नाही.आधार आणि बँक खात्याच्या माहितीतील चुका हे देखील एक मोठं कारण ठरते.
- नावाच्या स्पेलिंगमध्ये फरक असणे
- बँक खाते बंद असणे
- IFSC कोड बदललेला असणे
- बँक KYC अपडेट न केलेली असणे
जमिनीशी संबंधित कागदपत्रांमध्ये समस्या
- जमीन नोंद (Record) अपडेट न असणे
- म्युटेशन (फेरफार) प्रलंबित असणे
- जमीन वादात असणे