Raj Thackeray latest Interview : मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून महायुतीला धक्का देण्यासाठी ठाकरे ब्रँडची जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधकांना धारेवर धरलं आहे. जागावाटपावरून मनसेच्या काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असली, तरी ठाकरे यांनी उमेदवारांची मनधरणी केल्याचं समजते. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर जोर दिला जात आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी नुकतच त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मतदारांना आवाहन करण्यासाठी उद्धव ठाकरेंसह राज ठाकरे मुलाखतींच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. नुकतच एका मुलाखतीत राज ठाकरेंनी विरोधकांचा समाचार घेतानाच मुंबई शहराबाबत मोठं विधान केलं आहे.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे म्हणाले, "भूलोगाशिवाय इतिहास नाही, भूगोल काढला तर लक्षात येईल बुलेट ट्रेन कुठून कुठे चालली आहे.महाराष्ट्रातील प्रत्येक राजकारण्याने विचार करण्याची गरज आहे की महाराष्ट्राभोवतीचा विळखा काय आहे. नंतर फक्त पश्चातापाचा हात डोक्यावर मारावा लागेल. मतभेद भांडणे असतील पण महाराष्ट्रापुढे ती काहीही नाही.योजना चांगल्या असतील तर आमचे केंद्रात आणि राज्यात सरकार आहे असं सांगणं ही कोणती मस्ती आहे.चांगल्या योजना असतील तर त्या मिळून केल्या पाहीजे.त्यांच्याकडे मोदी आणि ईव्हीएम आहे. लहानपणी आपण पत्त्यांचा बंगला करायचो.यांच्याकडचा पत्त्यांचा बंगला उलटा आहे.खालचा पत्ता हा नरेंद्र मोदींचा आहे. ज्याच्या जीवावर हे सगळे बोलतायत"
नक्की वाचा >> KDMC Election 2026 : राज ठाकरेंच्या दौऱ्याआधीच ठाकरे गटाला मोठा धक्का, श्रीकांत शिंदेंनी भाकरी फिरवली!
"आज जे मतदान होतंय ते मोदींच्या नावावर.."
राज ठाकरे पुढे म्हणाले, "आज जे मतदान होतंय ते मोदींच्या नावावर होतंय. योजना कितीही चांगल्या असल्या तरी येणाऱ्या लोंढ्यांमुळे योजना विस्कटतात. बाकीच्या राज्यात येणारे लोकं कंट्रोल करतात, आपल्याकडे तसे होत नाही. मी मुख्यमंत्र्यांना पार्किंगच्या समस्येसाठी भेटलो होतो, मोक्याच्या ठिकाणची मैदाने काढा त्याखाली पार्किंग करा असं मी सांगितलं होतं. पार्किगं लॉट होत नाही तोपर्यंत समस्या कायम राहणार आहे."
नक्की वाचा >> BMC Election 2026 : ठाकरेंच्या सभेला महापालिकेची परवानगी, मुंबईतील ठिकाण अन् तारीख ठरली, पण 'या' 24 अटी..
"पिवळा आणि काळा रंग जिथे आहे तिथे पार्किंग आणि पिवळा-लाल रंग आहे तिथे नो पार्किग असं सोपं तंत्र मी सांगितलं होतं. नो पार्किंगचे बोर्ड लावण्याची गरजच नाही पडणार. महिनाभरात ताबडतोब करू असं मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं होतं.महत्त्वाच्या मूळ प्रश्नांकडे यांचे लक्ष नाही, यांचे लक्ष निवडणुकांकडे, माणसे ढापायची,पैसे वाटायचे याकडे आहे.महाराष्ट्र असा होता का ?लोकांच्या गरजा, अपेक्षा छोट्या आहेत त्यादेखील लोंढ्यामुळे उद्ध्वस्त होत असतील; मराठी माणसाचे अस्तित्व उद्ध्वस्त होत असेल तर काय उपयोग? असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला",असंही राज ठाकरे म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world