PM Modi Birthday : डिजिटल इंडिया ते कलम 370, देश बदलणारे हे आहेत मोदींचे 9 मोठे निर्णय

PM Modi Birthday : गेल्या दहा वर्षात मोदींनी घेतलेले अनेक निर्णय गाजले. या निर्णयाचा सर्वसामान्यांच्या आयुष्यावर परिणाम झाला. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त देश बदललणारे त्यांचे काही प्रमुख निर्णय पाहूया

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंगळवारी म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी 74 वा वाढदिवस आहे. गुजरातचं मुख्यमंत्रीपद सांभाळलेले नरेंद्र मोदी 2014 साली पहिल्यांदा पंतप्रधान झाले. 2014, 2019 आणि 2024 या तीन लोकसभा निवडणुकीत भारतीय मतदारांनी मोदींवर विश्वास दाखवला आहे. सलग तीन लोकसभा निवडणुका जिंकून पंतप्रधान झालेले मोदी हे पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतरचे दुसरेच पंतप्रधान आहेत. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

गेल्या दहा वर्षात मोदींनी घेतलेले अनेक निर्णय गाजले. या निर्णयाचा सर्वसामान्यांच्या आयुष्यावर परिणाम झाला. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त देश बदललणारे त्यांचे काही प्रमुख निर्णय पाहूया

मेक इन इंडिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात 25 सप्टेंबर 2014 रोजी 'मेकइन इंडिया' कार्यक्रमाची सुरुवात केली. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणे, व्यापाराच्या दृष्टिकोणात बदल करणे, गुंतवणुकीला चालना देणे हे या योजनेचे उद्देश होते. 'मेक इन इंडिया' मुळे देशात 'स्टार्टअप' ची संस्कृती तयार झाली आहे. उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रामध्ये या योजनेचा परिणाम आता दिसत आहे. 

डिजिटल इंडिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 साली डिजिटल इंडियाची सुरुवात केली. मोदी सरकारचा हा निर्णय नव्या भारताच्या निर्मितीमध्ये गेमचेंजर ठरला आहे. मोदींच्या डिजिटल इंडियाच्या व्हिजनमुळेच आज सर्वसामान्य भारतीय कितीही छोटा व्यवहार डिजिटल माध्यमातून करत आहे. देशात जागोजागी यूपीआय स्कॅनर दिसतात. अनेक गावांना हायस्पीड इंटरनेटनं जोडण्याचं काम डिजिटल इंडियानं केलं आहे. 

( नक्की वाचा : Vande Metro : देशातील पहिल्या 'वंदे मेट्रो'चं किती आहे तिकीट? काय आहे वेगळेपण? वाचा संपूर्ण माहिती )
 

नोटबंदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री काळ्या पैशांवर सर्जिकल स्ट्राईक करत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्या. दहशतवाद्यांचे फंडिग थांबवणे, काळ्या धनावर नियंत्रण आणणे आणि भ्रष्टाचार बंद करणे हे मोदींच्या या निर्णयाचे वैशिष्ट्य होते. 

Advertisement

370 कलम रद्द

मोदी सरकारनं 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू काश्मीरलला लागू असलेले कलम 370 रद्द केले. जम्मू काश्मीरला असलेला विशेष राज्याचा दर्जा रद्द केला. जम्मू काश्मीरचे दोन भागात विभाजन करत केंद्रशासित प्रदेश बनवले. मोदी सरकारच्या आजवरच्या कारकिर्दीमधील हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. 

( नक्की वाचा : मोदी थांबवणार रशिया-युक्रेन युद्ध! थेट पुतीनकडून आला प्रस्ताव )
 

ट्रिपल तलाक

नरेंद्र मोदी सरकारनं ट्रिपल तलाकाची प्रथा रद्द करण्यासाठी 26 जुलै 2019 रोजी लोकसभेत याबाबतचं विधेयक पास करुन घेतलं. 30 जुलै 2019 रोजी राज्यसभेनंही या विधेयकाला मान्यता दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या निर्णयामुळे लाखो मुस्लीम महिलांना दिलासा मिळाला. महिला सशक्तीकरणासाठी मोदी सरकारनं उचलेलं हे मोठं पाऊल होतं. 

Advertisement

CAA 

मोदी सरकारच्या मोठ्या निर्णयामध्ये CAA चा समावेश आहे. 10 जानेवारी 2020 रोजी देशभरात CAA लागू झाले. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या अल्पसंख्याकांना भारताचं नागरिकत्व देणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. 

( नक्की वाचा : शिवाजी महाराजांची माफी, सावरकरांचा उल्लेख, मोदींनी कसं बदललं राज्याचं राजकारण? )
 

GST 

मोदी सरकारनं 1 जुलै 2017 रोजी देशभर GST लागू केले. देशातील अर्थव्यवस्थेसाठी हा एक महत्त्वाचा निर्णय आहे. 

दक्षिण ध्रुवावार चंद्रायान

23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताच्या चंद्रयानानं लँडिंग केलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचलेला भारत पहिला देश बनला आहे. या मिशनच्या यशाचं श्रेय इस्रोच्या वैज्ञानिकांसह मोदी सरकारलाही देण्यात आले. 

Advertisement


G20 चं यजमानपद

भारतानं 9-10 सप्टेंबर रोजी जी-20 शिखर परिषदेचं यजमानपद भूषवलं. या परिषदेमध्ये जगभरातील शक्तीशाली देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी झाले होते. हे संमेलन यशस्वी होण्याचे श्रेय मोदी सरकारचं आहे. G-20 संमेलनानंतर जगभरात भारताची प्रतिमा उजळली आहे.