जाहिरात

शिवाजी महाराजांची माफी, सावरकरांचा उल्लेख, मोदींनी कसं बदललं राज्याचं राजकारण?

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Narendra Modi) शुक्रवारी पालघरमध्ये होते.

शिवाजी महाराजांची माफी, सावरकरांचा उल्लेख, मोदींनी कसं बदललं राज्याचं राजकारण?
मुंबई:

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे. या प्रकरणात बांधकाम सल्लागार चेतन पाटीलला अटक करण्यात आली आहे. महाविकास आघाडीनं हा प्रमुख मुद्दा केला आहे. त्यांनी या प्रकरणात केंद्र सरकारलाही लक्ष्य केलंय. या सर्व गदारोळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Narendra Modi) शुक्रवारी पालघरमध्ये होते. त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या प्रकरणात सार्वजनिक माफी मागितली. त्याचवेळी स्वातंत्र्यवीर सावरकर  (Vinayak Damodar Savarkar)  यांचा उल्लेख करत महाविकास आघाडीला अडचणीत आणलं आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले पंतप्रधान ?

पालघरमधील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये जे घडलं ते अतिशय दुर्दैवी आहे.  छत्रपती शिवाजी महाराज माझ्यासाठी आणि माझ्या मित्रांसाठी फक्त एक नाव नाही. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक राजे नाहीत तर ते आमच्यासाठी पूजनीय आहेत. मी आज छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो.' 

( नक्की वाचा : 'शरद पवारांना हे शोभत नाही,' पुतळा कोसळल्याच्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार )

पंतप्रधान मोदींनी सांगितलं, ' मी नतमस्तक होऊन आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची माफी मागतो. आमचे संस्कार वेगळे आहेत. आम्ही शिव्या देणारी लोकं नाहीत. पण महाराष्ट्रात काही जण भारतमातेचे थोर सुपूत्र, या भूमीचे सुपूत्र स्वातंत्र्यवीर सावकरांचा अपमान करत आहेत. ते यासाठी माफी मागायला तयार नाहीत. या विषयावर न्यायालयीन लढाई लढण्याची त्यांची तयारी आहे.'

छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फूट उंच पुतळा 26 ऑगस्ट रोजी कोसळला होता. या प्रकरणात सिंधुदुर्ग पोलीस स्टेशनमघ्ये FIR दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीत ठाण्याचा मूर्तीकार जयदीप आपटेचंही नाव आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणात यापूर्वीच माफी मागितली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com