PM Narendra Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आज संबोधीत केलं. यावेळी त्यांनी महिला आरक्षण विधेयकावरून विरोधी पक्षांवर निशाणा साधला. तसच मोदींनी देशातील महिलांची माफी मागितली. मोदी म्हणाले, काल संसेदत महिला आरक्षणासंबंधीत विधेयकाला ज्या पक्षांनी विरोध दर्शवला, त्यांना मला एक सांगायचं आहे.लोक नारीशक्तीला हलक्यात घेत आहेत. ते विसरत आहेत की, 21 व्या शतकातील नारी नारी प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवते.यामुळे महिला आरक्षणाला रोखण्याचं जे पाप केलं आहे, याची शिक्षा नक्कीच मिळेल.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आज भारताचा प्रत्येक नागरिक पाहत आहे की, कशाप्रकारे भारताच्या नारी शक्तीला रोखण्यात आलं. त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला. आम्ही खूप प्रयत्न करूनही यशस्वी झालो नाहीत. यासाठी मी देशाच्या मात-भगिनींची माफी मागतो.
नक्की वाचा >> Akola News: अकोल्यात भीम ज्योत कार्यक्रमात ‘बूट' वाद; दोन आमदारांवर आरोप, वंचित बहुजन आघाडी आक्रमक
आमच्यासाठी देशहित महत्त्वाचं : पीएम मोदी
आमच्यासाठी देशहित महत्त्वाचं आहे. पण काही लोकांसाठी पक्षहित सर्वात महत्त्वाचं असतं. जेव्हा पक्षहित देशापेक्षा मोठं होतं, तेव्हा नारी शक्तीला देशहिताला याचा परिणाम भोगावा लागतो. यावेळीही असंच झालं. काँग्रेस, DMK,TMC आणि समाजवादी सारखे पक्ष स्वार्थी राजकारणाचा फटका देशाच्या नारी शक्तीला बसतो. महिला आरक्षणाचा विरोध करण्याचं जे पाप विरोधकांनी केलं आहे,त्याची त्यांना शिक्षा नक्की मिळेल. या पक्षांनी संविधान बनवणाऱ्यांच्या भावनांचाही अपमान केला आहे. जनतेच्या शिक्षेतूनही ते वाचू शकत नाहीत,असंही मोदी म्हणाले.