रामराजे शिंदे, प्रतिनिधी
Vande Bharat Sleeper Train Latest News : केंद्र सरकारने नववर्षाच्या सुरुवातीलाच रेल्वे प्रवाशांना मोठं गिफ्ट दिलं आहे.देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन पश्चिम बंगाल ते आसाम दरम्यान लवकरच धावणार आहे.या रेल्वेच्या उद्घाटनाच्या वेळेबाबतही वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पश्चिम बंगालची निवडणूक तोंडावर असतानाच प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आलीय. ही रेल्वे कोलकाता ते गुवाहाटी दरम्यान धावणार असून या ट्रेनमध्ये अत्याधुनिक सुविधाही असणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकताच पश्चिम बंगालचा तीन दिवसांचा दौरा केला.रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून धावणार असल्याची घोषणा केलीय.अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.पण या ट्रेनच्या खास वैशिष्ट्यांबाबत अनेक चर्चा रंगल्या आहेत. या ट्रेनमध्ये नेमकी काय वैशिष्ट्ये असणार आहेत? जाणून घ्या सविस्तर माहिती.
वंदे भारत स्लीपर ट्रेनची खास वैशिष्ट्ये
- कामाख्या ते हावडा दरम्यान ट्रेन धावणार
- 1500 किमीच्या अंतरावर रेल्वे धावणार
- एकावेळी 823 प्रवाशी प्रवास करू शकतील
- रेल्वेत 16 कोच असतील तर 11 एसी 3,4 एसी 2 टियर आणि 1 एसी फर्स्ट क्लास असेल.
- सुरक्षेसाठी कवच प्रणाली असेल.सीसीटीव्ही,बायोवॅक्यूम टायलेट,नाईट लायटिंग,आटो डोअर सुविधा असेल.
ही वंदे भारत ट्रेन पश्चिम बंगाल आणि आसाममधील 10 जिल्ह्यांतून जाणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
पश्चिम बंगाल मधील कूच बिहार,जलपाईगुडी,मालदा,मुर्शीदाबाद,पूर्ब वर्धमान,हुगळी,हावडा तसेच आसाम मधील कमरूप मेट्रोपोलिटन आणि बोनगाईगांव या जिह्यातूनही ही ट्रेन प्रवास करणार आहे.या रेल्वेची चाचणी घेतली असता कोटा नगदा मार्गावर रेल्वने प्रतितास 180 किमी वेग गाठला.
नक्की वाचा >> Pune News : नववर्षात पुण्यात प्रवास करताय? 'हा' नियम मोडणाऱ्या 240 वाहनचालंकावर पुणे पोलिसांची मोठी कारवाई!
तिकीटाचे दर काय असतील?
- AC 3 टायरसाठी - 2300 रुपये
- AC 2 टायरसाठी - 3000 रूपये
- AC फर्स्टक्लास साठी – 3600 रूपये
शिवाय प्रत्येक कोचमध्ये वाचनासाठी लाईट्स,मोबाईल चार्जिंग पाईंट्स,फोल्डेबल स्नॅक टेबल्स असणार आहेत.या अत्याधुनिक सुविधांमुळे प्रवाशांना लांब पल्ल्याच्या प्रवासात आरामदायी सुविधा मिळणार आहेत.
नक्की वाचा >> कल्याण-डोंबिवलीत महायुतीनं उधळला विजयी गुलाल, आज बिनविरोध निवडून आलेले 'ते' 6 उमेदवार कोण?
ट्रेनच्या सुविधेचा भाजपला होणार फायदा?
याच वर्षात आसाम आणि पश्चिम बंगाल मध्ये निवडणूका आहेत. आसाममध्ये 10 वर्षापासून भाजपची सत्ता आहे. मागील निवडणूकीत 294 पैकी भाजपला 77 जागांसह 38 टक्के मतं मिळाली.टीएमसीला 216 जागा मिळाल्या आणि 48 टक्के मतं मिळाली. ही वंदे भारत स्लीपर ट्रेन पूर्वेकडील राज्यांना जोडणारी आणि पश्चिम बंगाल ते आसाम मध्ये कनेक्टिव्हिटी वाढविणारी असणार आहे. 1 फेब्रुवारीला केंद्राचा अर्थसंकल्प आहे. त्यापूर्वी या वंदे भारत स्लीपर ट्रेनचं उदघाटन होणार आहे. शिवाय पश्चिम बंगालच्या निवडणूकीपूर्वी ही रेल्वे धावणार आहे. त्यामुळे या रेल्वेचा भाजपला निवडणुकीत कितपत फायदा मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.