PM Modi Birthday: मोदींचा 75 वा वाढदिवस; त्यांच्या प्रवासातील काही दुर्मीळ फोटो जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

PM Narendra Modi's 75th Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बुधवारी (17 सप्टेंबर) 75 वा वाढदिवस आहे. एक चहावाला ते देशाचे यशस्वी पंतप्रधान असा त्यांचा थक्क करणारा प्रवास आहे

जाहिरात
Read Time: 2 mins
PM Narendra Modi's 75th Birthday : पंतप्रधान मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे दुर्मीळ फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. 
मुंबई:

PM Narendra Modi's 75th Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बुधवारी (17 सप्टेंबर) 75 वा वाढदिवस आहे. एक चहावाला ते देशाचे यशस्वी पंतप्रधान असा त्यांचा थक्क करणारा प्रवास आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. संघाचे प्रचारक म्हणून काम करत असतानाच त्यांनी भाजपामध्ये काम करण्यास सुरुवात केली.

भाजपामध्ये वेगवेगळ्या संघटनात्मक जबाबदारी पार पाडल्यानंतर 2001 साली ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी ते साधे आमदारही नव्हते. त्यानंतर 2014 साली ते पहिल्यांदा खासदार आणि देशाचे पंतप्रधान झाले. 

2014, 2019 आणि 2024 अशा तीन सलग लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले. इंदिरा गांधी यांचा सलग पंतप्रधानपद भूषविण्याचा विक्रम त्यांनी मोडला आहे. मोदी यांच्या पंतप्रधानपदाची वर्ष हा नुसता संख्यात्मक आकडा नाही. तर देशात झालेला गुणात्मक बदल आहे.

कलम 370 रद्द करणे, ऑपरेशन सिंदूर, पायाभूत सुविधांच्या विकासात दिलेला भर, आर्थिक गंगाजळी मजबूत करण्यावर भर, थेट गरिबांचे कल्याण करणाऱ्या योजना, त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये पोहचणारे पैसे, त्यामधून कमी झालेला भ्रष्टाचार जगभरात वाढलेली भारताची पत ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजवरच्या कारकिर्दीतील प्रमुख उदाहरणं आहेत.

Advertisement

पंतप्रधान मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे दुर्मीळ फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. 

तरुण NCC कॅडेट ते देशाचे पंतप्रधान! या विद्यार्थ्यांमधील नरेंद्र मोदी तुम्ही ओळखू शकाल का?  

Photo Credit: ( फोटो सौजन्य - @modiarchive/X)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तरुणपणी देशभरात पायी, सायकलवर, मोटारसायकलनं भरपूर प्रवास केला. या प्रवासात त्यांनी देशातील दुर्गम भागाला भेट दिली. देशाचे प्रश्न समजून घेतले. 

Photo Credit: ( फोटो सौजन्य - @modiarchive/X)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) मोठा प्रभाव आहे. संघाचे प्रचारक म्हणून काम करत असताना तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्यासोबत नरेंद्र मोदी.

Advertisement

Photo Credit: ( फोटो सौजन्य - @modiarchive/X)


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणपणी अमेरिकेला भेट दिली होती. या फोटोत मोदी टी शर्टमध्ये दिसत आहेत. 

Photo Credit: ( फोटो सौजन्य - @modiarchive/X)

Photo Credit: ( फोटो सौजन्य - @modiarchive/X)

पंतप्रधान नरेंद्र मोदी 1991-92 मध्ये भाजपाने काढलेल्या एकता मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

Photo Credit: ( फोटो सौजन्य - @modiarchive/X)

नरेंद्र मोदी 2001 साली गुजरातचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्रिपदाच्या सुरुवातीच्या काळात गुजरातची अस्मिता जागवण्याचं काम त्यांनी केलं.

Photo Credit: ( फोटो सौजन्य - @modiarchive/X)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी सध्या राजकीय मतभेद आहेत. पण, बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत त्यांचे नेहमीच चांगले संबंध होते. 

Photo Credit: ( फोटो सौजन्य - @modiarchive/X)

कारगिल युद्धाच्यावेळी भारतीय जवानांसोबत नरेंद्र मोदी. 

Photo Credit: ( फोटो सौजन्य - @modiarchive/X)

भाजपाचे माजी अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत नरेंद्र मोदी

Photo Credit: ( फोटो सौजन्य - @modiarchive/X)