Pok News: पाक व्याप्त काश्मीरमध्ये असंतोषाचा भडका! पाक फौजेचा गोळीबार, Pok मध्ये नक्की काय घडतय?

AAC चे प्रतिनिधी, PoK प्रशासन आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये अनेक तास मॅरेथॉन चर्चा झाली.

जाहिरात
Read Time: 2 mins

पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये (PoK) सध्या बंडाळी उसळली आहे. येथील नागरिक शहबाज शरीफ सरकारच्या विरोधात मोठे आंदोलन करत आहेत. अवामी ॲक्शन कमिटी (AAC) ने सोमवारी September 29 रोजी संप पुकारला होता. तो हाणून पाडण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराकडून सर्व मर्यादा ओलांडण्यात आल्या. आंदोलकांना पांगवण्यासाठी लष्कराने सामान्य नागरिकांवर गोळीबार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र, लष्कराच्या कठोर प्रयत्नानंतरही स्थानिक नागरिक माघार घेतली नाही. एका व्हिडीओमध्ये संतप्त जमावाने पाकिस्तान लष्कराच्या एका अधिकाऱ्याला ताब्यात घेतल्याचेही दिसून आले आहे.

PoK च्या इतिहासातील सर्वात मोठ्या नागरी बंडांपैकी हे एक मानले जात आहे. AAC ने हा संप अनिश्चित कालावधीसाठी वाढवण्याचे संकेत दिले आहेत. आंदोलकांच्या वाढत्या रोषामुळे इस्लामाबाद सरकारने मोठ्या प्रमाणात सुरक्षा दले तैनात केली आहेत. रविवारी मध्यरात्रीपासून इंटरनेट सेवा बंद केली आहे. अनेक वर्षापासून राजकीय आणि आर्थिक दुर्लक्षाच्या पार्श्वभूमीवर AAC ने 38-सूत्रीय रचनात्मक सुधारणांची मागणी केली आहे. 

नक्की वाचा - IND Vs Pak: ट्रॉफीचोर पाकिस्तान! मोहसीन नक्वी चषक घेऊन पळाला, आता BCCI शिकवणार धडा

या प्रमुख मागण्यांमध्ये, पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या काश्मिरी निर्वासितांसाठी PoK विधानसभेत आरक्षित असलेल्या 12 कायदेमंडळ जागा संपुष्टात आणणे, अनुदानावर आधारित पीठ (आटा), मंगला जलविद्युत प्रकल्पाशी संबंधित योग्य वीज दर आणि प्रलंबित सुधारणांची अंमलबजावणी यांचा समावेश आहे. AAC चे प्रमुख नेते शौकत नवाज मीर यांनी स्पष्ट केले आहे की, "हा लढा कोणत्याही संस्थेविरुद्ध नसून, गेल्या 70 वर्षांहून अधिक काळ वंचित ठेवलेल्या मूलभूत अधिकारांसाठी आहे." त्यातूनच हा लढा आता भडकल्याचं चित्र आहे. 

BCCI Prize Money: पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या! BCCIकडून टीम इंडियावर पैशांचा पाऊस! ट्वीट करत मोठी घोषणा

AAC चे प्रतिनिधी, PoK प्रशासन आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये अनेक तास मॅरेथॉन चर्चा झाली. परंतु 3 तास चाललेल्या या बैठकीनंतर बोलणी फिसकटली. AAC ने विशेषाधिकार व निर्वासित विधानसभा जागा संपुष्टात आणण्याच्या मागणीवर कोणताही समझोता करण्यास नकार दिला. यानंतर शौकत नवाज मीर यांनी, "चर्चा अपूर्ण आणि अनिर्णायक होती," असे जाहीर करत संप सुरूच ठेवण्याची घोषणा केली. त्यामुळे या पुढच्या काळातही पाक व्याप्त काश्मीरमधील परिस्थिती चिघळण्याची दाट शक्यता आहे. 

Advertisement