ती भारतीय, तो POK मध्ये, ऑनलाईन सूत जुळलं, प्रेमासाठी LoC चं बंधंन तोडलं, पण दोन मिनिटांची भेट अन्...

या भेटीत जीशान काहीही बोलू शकला नाही. तो केवळ तिला पाहून रडत राहिला होता.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • पाकव्याप्त काश्मिरातील जीशान अहमद मीरने ऑनलाईन प्रेमासाठी भारतात नियंत्रण रेषा ओलांडून आला
  • जीशानला भारतीय लष्कराने ताब्यात घेतले आणि त्याच्यावर बेकायदेशीर प्रवेशाचा गुन्हा दाखल केला
  • त्याने प्रेम कहाणी लष्करी अधिकाऱ्यांना सांगितली, ज्यामुळे त्याचा देशविरोधी हेतू नसल्याचे उघड झाले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

प्रेमात व्यक्ती काही करू शकतो. याचा अनुभव अनेक वेळा आला आहे. प्रेमाला सीमा नसतात हेच खरे. पाकिस्तानातील सिमा हैदरने हे सिद्ध करुन दाखवलं आहे. तसाच एक प्रकरा पुन्हा एकदा समोर आला आहे. पाक व्याप्त काश्मिर (POK) मध्ये राहणाऱ्या एका तरुणाची ऑनलाईन ओळख भारतीय तरुणीसोबत झाली. दोघांची मैत्री झाली. पुढे मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. पण या प्रेमाच्या आड होती ती दोन्ही देशांची बॉर्डर. पण बॉर्डर प्रेमा पेक्षा मोठी नाही हे त्या तरुणाने ठरवलं होतं. त्यातून त्याने थेट बॉर्डर क्रॉस करून भारतात येण्याचा निर्णय घेतला. त्यात तो यशस्वी ही झाला. पण पुढे जे काही घडलं त्याचा विचार ही त्याने केला नसले.  

जीशान अहमद मीर असं या तरुणाचं नाव आहे. तो पाक व्याप्त काश्मिरच्या पंकेडी गावात राहातो. त्याने स्नॅपचॅटवरील प्रेमासाठी नियंत्रण रेषा (LoC) ओलांडण्याचा निर्णय घेतला. तो ही बॉर्डर क्रॉस करत भारतात दाखल ही झाला. मात्र त्याच वेळी जीशान अहमद मीर याला भारतीय लष्कराने ताब्यात घेतलं. या तरुणाला अखेर महिनाभराच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर शनिवारी परत पीओकेमध्ये पाठवण्यात आले. भारतीय लष्कर आणि पोलिसांनी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले. मात्र, जाण्यापूर्वी झालेल्या अवघ्या 2 ते 3 मिनिटांच्या शेवटच्या भेटीत जीशान आणि त्याची प्रेयसी इरम मजीद यांच्यातील विरह पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.

Advertisement

नक्की वाचा - पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा भूकंप! एका रात्रीत सुत्र हलली, हाय व्होल्टेज ड्राम्याने क्रिकेट जगत हादरलं

​पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) पंकेडी गावात जीशना राहतो. त्याचे वय 31 वर्ष आहे. जीशान 31 मे रोजी उरी सेक्टरमधून भारतीय हद्दीत घुसला होता. तो भारतीय हद्दीत घुसत असतानाच त्याला भारतीय लष्कराने ताब्यात घेतले. सुरुवातीला तो घुसखोर असल्याचा संशय आला होता. त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. त्यात त्याने आपली सर्व प्रेम कहाणी लष्करी अधिकाऱ्यांना सांगितली.  तो देशविरोधी किंवा संशयास्पद हेतूने भारतात आला नसल्याचं ही स्पष्ट झालं. स्नॅपचॅटवर ओळख झालेल्या बारामुल्ला येथील इरम मजीद या तरुणीला भेटण्यासाठीच त्याने हे धाडस केले होते.

नक्की वाचा - DMart Bill: डी मार्टच्या बिलावर पेनाने तीन रेषा का मारतात? 99 टक्के लोकांना याची कल्पनाच नाही

​जीशान भारतात बेकायदेशीर पणे आला होता. अशा पद्धतीने भारतात प्रवेश करणे हा एक गुन्हा आहे. तसा गुन्हा दाखल ही करण्यात आला. त्यानंतर जीशानची रवानगी बारामुल्ला कारागृहात करण्यात आली होती. नुकतेच उरी न्यायालयाने आरोपपत्र स्वीकारून हे प्रकरण निकाली काढले आहे. त्यानुसार शनिवारी दुपारी 12:30 वाजता कमान पोस्ट येथे जीशानला पाकिस्तानी लष्कराच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी त्याची प्रेयसी इरम आपल्या कुटुंबासह त्याला भेटायला आली होती. या वेळी त्यांना दोन ते तिन मिनिटे भेटण्याचा वेळ दिला होता. या भेटीत जीशान काहीही बोलू शकला नाही. तो केवळ तिला पाहून रडत राहिला होता. या आश्रूंसह तो इरमला पाहत पाहत पीओकेमध्ये परतला.