- पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खराब कामगिरीमुळे शान मसूदला कर्णधारपदावरून हटवले आहे
- शान मसूदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने १६ कसोटी सामने खेळले, त्यातील १२ सामन्यांत पराभव पत्करला
- वेस्ट इंडिज आणि इंग्लंड दौऱ्यासाठी पाकिस्तान क्रिकेट संघात चार युवा खेळाडूंना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे
Cricket News: पाकिस्तान क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. त्यासाठीच पाकिस्तान क्रिकेट ओळखले जाते की काय अशी चर्चा आता क्रिकेट जगतात होत आहे. अशीच एक घटना पाकिस्तान क्रिकेटमध्ये घडली आहे. एका हाय व्होल्टेज ड्राम्याने एका रात्रीत पाक किक्रेटमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. सध्या पाक किक्रेट संघ लागोपाठ पराभव सहन करत आहे. या लाजिरवाण्या पराभवांनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) अखेर मोठा निर्णय घेतला आहे. खराब कामगिरीमुळे शान मसूदला रातोरात कर्णधारपदावरून हटवण्यात आले आहे. त्याच्या जागी आता नवा कॅप्टन नेमण्यात आला आहे.
शान ऐवजी आता पाकिस्तान क्रिकेट संघाचे नेतृत्व बाबर आझम करणार आहे. त्याच्याकडे पुन्हा एकदा कसोटी संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड दौऱ्यासाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. त्यात हा मोठा निर्णय घेण्यात आला. शान मसूदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाची कामगिरी हवी तेवढी चांगली झाली नाही. एका मागून एक पराभव स्विकारावे लागले. त्याच्या कॅप्टनशिपमध्ये 16 कसोटी सामने खेळले गेले. त्यातील 12 सामन्यांत पाकिस्तानला पराभव झाला होता. त्यामुळे शान मसूदवर टिकेची झोड उठली होती. पाकिस्तानचे क्रिकेट प्रेमी चिडले होते.
नुकतीच बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका ही पाकिस्तानने त्याच्याच नेतृत्वाखाली गमावली होती. त्यानंतर तर मसूदला संघाच्याच बाहेर काढण्याची मागणी होवू लागली. त्यापूर्वी, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतही पाकिस्तानचा सुफडा साफ झाला होता. अखेर सिलेक्टर्सचा संयम संपला आहे. त्यांना मोठा निर्णय घ्यायचा होता. तो निर्णय घेत त्यांनी मसूदला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्याच्या ऐवजी संघातील अनुभवी खेळाडू बाबर आझमकडे नेतृत्व दिले आहे. निवड समितीने वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी 16 खेळाडूंची निवड केली आहे.
पाकिस्तानच्या कसोटी क्रिकेट संघात चार युवा खेळाडूंना पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. यामध्ये डावखुरा स्पीनर अली उस्मान, फलंदाज मुहम्मद अवैस जफर, वेगवान गोलंदाज उबैद शाह आणि विकेटकिपर मुहम्मद गाजी गोरी यांचा समावेश आहे. सौद शकील याला इंग्लंड दौऱ्यासाठी 17 वा खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे. मात्र त्याला संघात सामील होण्यापूर्वी फिटनेस टेस्ट पास करावी लागेल. दरम्यान कॅप्टन बदलला की नशीब बदलेल याच आशेने पीसीबीने पुन्हा एकदा जुनाच डाव खेळला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world