पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनं (Economic Advisory Council of Prime Minister) देश आणि जगभरातील बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक लोकसंख्येबाबत अभ्यास केला आहे. या अभ्यासानुसार देशातील हिंदूंच्या (Hindu) लोकसंख्येत 7.82 टक्के घट झाली आहे. 1950 ते 2015 या कालावधीतील ही आकडेवारी आहे. या रिपोर्टनुसार 1950 सााली हिंदूच्या लोकसंख्येचं प्रमाण 84.68 टक्के होतं. ते 2015 मध्ये 78.06 पर्यंत कमी झालं आहे. पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्य शामिका रवी, सल्लागार अपूर्व कुमार मिश्र आणि अब्राहम जोस यांनी हा अहवाल तयार केला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारतामध्ये किती वाढली मुसलमानांची लोकसंख्या?
या रिपोर्टनुसार मुस्लिमांची लोकसंख्येत 43.15 टक्के वाढ झाली आहे. 1950 साली मुस्लिमांची लोकसंख्या 9.84 टक्के होती. ती 2015 मध्ये 14.09 टक्के झाली आहे. या कालावधीमध्ये ख्रिश्चनांच्या लोकसंख्येत 5.38 टक्के वाढ झालीय. ख्रिश्चनांची लोकसंख्या 2.24 टक्के होती. ती आता 2.36 टक्के झालीय.
शीख धर्माच्या लोकसंख्येत 6.38 टक्के वाढ झालीय. देशात 1950 साली शिखांच्या लोकसंख्येचं प्रमाण 1.24 टक्के होतं. ते 2015 मध्ये वाढून 1.85 टक्के झालंय. तर बौद्ध धर्मियांची लोकसंख्याही वाढलीय. या रिपोर्टनुसार बौद्ध लोकसंख्येचं प्रमाण 0.05 टक्क्यांवरुन 0.81 टक्के झालंय.
( नक्की वाचा : फक्त 15 सेकंद पोलीस बाजूला केले तर...अकबरुउद्दीन ओवैसींना नवनीत राणांचं चॅलेंज )
कोणत्या धर्माची लोकसंख्या कमी ?
देशातील धार्मिक अल्पसंख्याकमध्ये जैन धर्मियांच्या लोकसंख्येत घसरण झालीय. भारतामध्ये 1950 साली जैन धर्मियांच्या लोकसंख्येचं प्रमाण 0.45 टक्के होतं. ते 2015 मध्ये कमी होऊन 0.36 टक्के झालंय. याच कालावधीमध्ये पारशी धर्मियांच्या लोकसंख्येत तब्बल 85 टक्के घसरण झालीय. 1950 साली पारशी लोकसंख्येचं प्रमाण 0.03 टक्के होतं. ते 2015 मध्ये कमी होऊन 0.004 इतकं झालं आहे.
बहुसंख्याक आणि अल्पसंख्याकाच्या लोकसंख्येतील चढ-उताराच्या आंतरराष्ट्रीय ट्रेंड समजून घेण्यासाठी 167 देशांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासानुसार भारतीय उपखंडातील मुस्लीमबहुल देशांमध्ये मालदीवचा अपवाद वगळता अन्य सर्व देशांमध्ये बहुसंख्याकाच्या लोकसंख्येत वाढ झालीय. मालदीवमध्ये बहुसंख्याक शैफी सुन्नीच्या लोकसख्येत 1.4 टक्के घसरण झालीय.
( नक्की वाचा : 'पूर्व भारतामधील लोक चिनी तर दक्षिणेतील आफ्रिकन सारखी दिसतात', पित्रोदांच्या वक्तव्यानं नवा वाद )
भारतीय उपखंडातील परिस्थिती
बांगलादेशमध्ये धार्मिक बहुसंख्याकाच्या लोकसख्येत 18 टक्के वाढ झालाय. तर पाकिस्तानमध्ये बहुसंख्यात धार्मिक हनफी मुस्लिमांच्या लोकसंख्येत 3.75 टक्के वाढ झाली आहे. पाकिस्तानमधील मुस्लिमांच्या एकूण लोकसंख्येत 10 टक्के वाढ झालीय.
म्यानमार आणि नेपाळ या गैरमुस्लीम बहुसंख्याक देशामध्ये बहुसंख्याकांच्या लोकसंख्येत घसरण झालीय. म्यानमारमध्ये थेरवाद बौद्ध लोकसंख्येत 10 टक्के घसरण झालीय. तर नेपाळमध्ये हिंदूंच्या लोकसंख्या 4 टक्के कमी झाली आहे. नेपाळमध्ये बौद्ध धर्मियांच्या लोकसंख्येत तीन टक्के घसरण झाली असून मुस्लिमांच्या लोकसंख्येत दोन टक्के वाढ झालीय, असं या अभ्यासातून स्पष्ट झालंय.