लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात (LokSabha Elections 2024) प्रचाराचा पारा चांगलाच वाढलाय. भाजपा नेता आणि अमरावतीमधील उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या एका वक्तव्यानं राजकारण तापलंय. AIMIM पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसीचे भाऊ अकबरुद्दीन ओवैसी यांनी काही वर्षांपूर्वी एक वाग्रस्त वक्तव्य केलं होतं. 15 मिनिटांसाठी पोलीस बाजूला केले तर आम्ही तुम्हाला सांगू असं ओवैसी यांनी म्हंटलं होतं. ओवैसीच्या त्या वक्तव्यावर नवनीत राणा यांनी उत्तर दिलंय.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नवनीत राणा यांनी हैदराबादमधील एका प्रचार सभेत बोलताना अकबरुद्दीन ओवैसींच्या 15 मिनिटांच्या वक्तव्यावर 15 सेकंदांचं चॅलेंज दिलं. 15 सेकंद पोलीस हटवले तर ते कुठून आले आणि कुठून गेले हे त्यांना समजणार नाही, असं राणा यांनी म्हंटलंय.
लहान भाऊ म्हणतो पोलिसांना 15 मिनिटांसाठी बाजूला केलं तर आम्ही काय करु शकतो हे दाखवून देऊ. मला त्यांना सांगायचं आहे, तुम्हाला 15 मिनिट लागतील. आम्हाला 15 सेकंद खूप आहेत. 15 सेकंद पोलीस बाजूला केले तर ते कुठून आले आणि कुठं गेले हे समजणार नाही,' असं राणा यांनी सांगितलं.
( नक्की वाचा : 'पूर्व भारतामधील लोक चिनी तर दक्षिणेतील आफ्रिकन सारखी दिसतात', पित्रोदांच्या वक्तव्यानं नवा वाद )
नवनीत राणा यांनी हैदराबादमध्ये भाजपा उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी भाषण केलं. त्यावेळी त्यांनी ओवैसी बंधूंना हे चॅलेंज दिलंय. अकबरुद्दीन ओवैसी यांच्या जुन्या भाषणाला त्यांनी उत्तर दिलंय, असं मानलं जातंय. राणा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या भाषणातील क्लिप शेअर केलीय.
15 सेकंद लगेगा @AkbarOwaisi_MIM @asadowaisi pic.twitter.com/TfEmWhvArX
— Navnit Ravi Rana (Modi Ka Parivar) (@navneetravirana) May 8, 2024
15 दिवस घ्या
AIMIM पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी नवनीत राणा यांच्या वक्तव्यावर पलटवार केलाय. 15 सेकंदच काय 15 तास घ्या, कोण घाबरतंय? आम्ही तयार आहोत. पंतप्रधान मोदींना सांगून 15 दिवस घ्या असा पलटवार ओवैसींनी केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world