Malegaon Blast: प्रसाद पुरोहित यांना बढती, 16 वर्षांपासून प्रमोशन रोखणारा 'तो' 'DV बॅन' काय होता?

Prasad Purohit Promoted : मालेगाव बॉम्बस्फोटातून निर्दोष मुक्तता झालेले लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्याबद्दलची मोठी बातमी आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Prasad Purohit : र्मी हेडक्वार्टर्सने त्यांच्यावरील डिसिप्लिन अँड विजिलेंस (DV) बॅन हटवला.
मुंबई:

Prasad Purohit Promoted :मालेगाव बॉम्बस्फोटातून निर्दोष मुक्तता झालेले लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्याबद्दलची मोठी बातमी आहे. तब्बल 16 वर्षांच्या थांबलेल्या त्यांच्या सैन्य कारकिर्दीला अखेर गती मिळाली आहे. आर्मी हेडक्वार्टर्सने त्यांच्यावरील डिसिप्लिन अँड विजिलेंस (DV) बॅन हटवल्यानंतर त्यांना 'कर्नल' या वरिष्ठ पदावर बढती देण्याचा निर्णय घेतला आहे

कोर्टाचा निर्णयानंतर हटली DV बंदी 

कर्नल प्रसाद पुरोहित यांची 31 जुलै 2025 रोजी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली. या प्रकरणात कर्नल पुरोहित यांना जवळपास 9 वर्षे तुरुंगात काढावी लागली होती. कोर्टाच्या निर्णयानंतर लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांच्या करिअरवर गेल्या 16 वर्षांपासून लावलेला डिसिप्लिन अँड विजिलेंस (Discipline and Vigilance - DV) बॅन हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.

सेनेतील सूत्रांनुसार, हा बॅन हटवण्याची फाईल साउदर्न कमांडकडे पाठवण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या बढतीसह इतर सर्व्हिस हक्क पुन्हा बहाल करण्याची प्रक्रिया सुरू झाली.

( नक्की वाचा : Malegaon Blast Case: 'PM मोदींचे नाव घेण्यासाठी टॉर्चर केले'...साध्वी प्रज्ञा यांचा खळबळजनक खुलासा )
 

डीव्ही बॅन म्हणजे काय?

सैन्याच्या नियमांनुसार, पुरोहित 2008 मध्ये अटकेनंतर 'डीव्ही बॅन' लावण्यात आला होता. या 'डीव्ही बॅन'मुळे अधिकाऱ्याचे नाव बढती बोर्डात जात नाही. कर्नल पदासाठी पात्र असूनही पुरोहित यांचे नाव कधीही बोर्डात गेले नव्हते, ज्यामुळे त्यांची संपूर्ण सैन्य कारकीर्द ठप्प झाली होती.

Advertisement

डीव्ही बॅन हटवण्याची फाईल साउदर्न कमांडकडून दिल्लीतील आर्मी हेडक्वार्टर्सकडे पाठवण्यात आली. तेथे उच्च स्तरावर 'डिक्लासिफिकेशन' आणि 'लीगल क्लिअरन्स' मिळाल्यानंतर स्पेशल बोर्डाने त्यांच्या जुन्या बढतीच्या मूल्यांकनाचे (Promotion Assessment) निकाल तपासले.

या प्रक्रियेनंतर अखेर त्यांना कर्नल पदावर बढती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

( नक्की वाचा : Thane-CSMT Metro: ठाण्याहून थेट CSMT मेट्रोनं गाठा; घोडबंदरची वाहतूक कोंडी फुटणार, 21 लाख प्रवाशांना दिलासा )
 

कर्नल पुरोहित यांची पार्श्वभूमी

कर्नल पुरोहित 1994 मध्ये मराठा लाइट इन्फेंटरीमध्ये (Maratha Light Infantry) सामील झाले होते. या स्फोट प्रकरणी आपल्याला राजकारणातून फसवण्यात आले होते, असा युक्तीवाद त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दिला होता. मालेगावमध्ये 2008 साली झालेल्या या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक जण जखमी झाले होते.

Advertisement
Topics mentioned in this article