Mahakumbh Stampede : महाकुंभमध्ये कशी झाली चेंगराचेंगरी? घटनास्थळावरील धक्कादायक Video आले समोर 

आज मौनी अमावस्येला अमृतस्नानासाठी 8 ते 10 कोटी भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

आज मौनी अमावस्येच्या दिवशी प्रयागराजमधील संगमावर झालेल्या चेंगराचेंगरीत 15 भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या चेंगराचेंगरीत 50 हून अधिक भाविक जखमी झाल्याचीही शक्यता आहे.

आज मौनी अमावस्येला अमृतस्नानासाठी 8 ते 10 कोटी भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे. धार्मिक मान्यतांनुसार मौनी अमावस्येच्या दिवशी पितरं जमीनीवर येतात. महाकुंभात स्नान करून पितरांना नैवेद्य दाखवून दान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. ग्रहांच्या स्थितीनुसार ठरलेल्या अमृतस्नानाच्या तिथी अत्यंत शुभ आणि पुण्यकारक मानल्या जातात. मौनी अमावस्येला स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होऊन पुण्य प्राप्त होते, अशी समजूत आहे. त्यामुळे आज महाकुंभमध्ये मोठी गर्दी झाली होती. 

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, संगमावर गर्दी होऊ नये यासाठी भाविकांचं विविध घाटांवर डायव्हर्जन करण्यात आलं होतं. मात्र भाविकांना संगमावरच स्नान करण्यास जायचं असल्याने एकाच ठिकाणी मोठी गर्दी जमा झाली. अनेकांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. यात पुढे जाण्याच्या स्पर्धेत लोक एकमेकांच्या अंगावर चढले. 

दरम्यान स्वामी रामभद्राचार्य यांनी संगमावर गर्दी करू नये असं आवाहन भाविकांना केलं आहे. कथावाचक देवकीनंदन ठाकूर म्हणाले की, माझी भाविकांना विनंती आहे की त्यांनी संगम घाटावर स्नान करण्यासाठी मोठी गर्दी करू नये. संपूर्ण गंगा आणि यमुना नदी या स्थितीत अमृतासमान आहे. 


 


Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world