चष्म्यापासून मुक्ती, मुंबईतील फार्मा कंपनीच्या Eyedrops ना केंद्राची मंजुरी; अवघ्या 15 मिनिटात दिसेल परिणाम

या आयड्रॉपमुळे लाखो-कोटी नागरिकांना मदत मिळू शकेल.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

नियमित चष्मा लावणाऱ्या लाखो-कोटी जनतेसाठी एक चांगली बातमी आहे. मुंबईतील एका फार्मा कंपनीने एका अनोख्या आयड्रॉपची निर्मिती केली आहे. 'प्रेस्बिओपिया' या समस्येशी लढणाऱ्या व्यक्तींना नव्या आयड्रॉपमुळे मोठा दिलासा मिळेल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. या आयड्रॉपमुळे तुम्हाला चष्म्यापासून मुक्ती मिळू शकेल असं त्यांचा विश्वास आहे. विशेष म्हणजे भारताच्या औषध नियामक संस्थेने या आयड्रॉपसाठी मंजुरी दिली आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापर्यंत आयड्रॉपची तपासणी पूर्ण केल्यानंतर आयड्रॉपला हिरवा कंदील देण्यात आला. 

मुंबईतील एन्टोड फार्मास्यूटिकल्सने (Entod) मंगळवारी प्रेस्वू आय ड्रॉप लॉन्च (PresVu Eye Drop Launch) केली आहे. या आयड्रॉपमध्ये  पिलोकार्पाइन या औषधाचा वापर करण्यात आला आहे. नवीन दाखल झालेलं आयड्रॉप 'प्रेस्बिओपिया' या समस्या कमी करण्यासाठी काम करतं आणि  परिणामी या समस्येने ग्रासलेल्या वयस्क व्यक्तींना मोठा आधार मिळू शकतो, असं कंपनीने सांगितलं.  

प्रेस्बिओपिया काय आहे? 
प्रेस्बिओपिया ही डोळ्यांची सामान्य समस्या आहे. वय वाढतं त्यानुसार ही समस्या वाढते. यामध्ये डोळ्यांची क्षमता कमकुवत होते. त्याशिवाय आपल्याहून लांब असलेल्या गोष्टी स्पष्टपणे दिसण्यास अडथळा येतो. वयस्क लोकांमध्ये ही समस्या अधिक दिसते. आपल्यापासून दूर असलेलं स्पष्ट न दिसणं, वाचायला त्रास होणं आणि डोळे सतत दुखणं हे प्रेस्बिओपिया समस्येची प्राथमिक लक्षणं आहेत. 

सहा तासांपर्यंत प्रभाव राहील...
एन्टोड फार्मास्यूटिकल्सचे सीईओ निखिल मसुरकर यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, या औषधाचा एक थेंब डोळ्यात  टाकल्यानंतर 15 मिनिटांत परिणाम दिसून येईल. याचा प्रभाव पुढील सहा तासांपर्यंत राहील. पहिला ड्रॉप टाकल्यानंतरच्या तीन तासात दुसरा ड्रॉप टाकला तर याचा प्रभाव अधिक कालावधीपर्यंत राहील. ते म्हणाले, आतापर्यंत डोळ्यांच्या समस्येसाठी चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर केला जात होता. काहीवेळा शस्त्रक्रियेच्या पर्यायाचा अवलंब केला जातो. मात्र त्यावर प्रेस्वू ड्रॉप्स फायदेशीर ठरेल. 

Advertisement

नक्की वाचा - 'Cyber Arrest झालाय' बँक अकाऊंट होईल रिकामी; गुन्हेगारांची नवी क्लृप्ती, सुशिक्षितांना कोट्यवधींचा गंडा!

कधीपर्यंत होईल उपलब्ध?
एन्टोड फार्मास्यूटिकल्स या कंपनीने आतापर्यंत आय, ईएनटी आणि त्वचेसंबंधित औषधं तयार केली आहेत. ही औषधं 60 हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जातात. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर या आयड्रॉप्स 350 रुपयांपर्यंत मेडिकलमध्ये उपलब्ध होतील. हे औषध 40 ते 55 वर्षे वयोगटातील लोकांसाठी सौम्य ते मध्यम प्रेस्बिओपियाच्या उपचारांत देता येईल. मसुरकर यांचा दावा आहे की, हे औषध भारतातील अशा प्रकारचं पहिलच औषध आहे ज्याची चाचणी भारतीय डोळ्यांवर करण्यात आली आहे आणि भारतीय लोकसंख्येच्या अनुवांशिकतेला आधार धरून  तयार करण्यात आली आहे.