Protests In Manipur : मणिपुरमध्ये 5 दिवस इंटरनेट बंद; हिंसक आंदोलन करणारे अरामबाई तेंगगोल काय आहे?

अरामबाई तेंगगोल वास्तवात एक मैतेई कट्टरपंथी समूह आहे. या समूहाची स्थापना त्या राज्याचे तत्कालीन राजा आणि राज्यसभा सदस्य लेशेम्बा सानाजाओबा यांनी केली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. मणिपूरमधील इंफाल पश्चिम, इंफाल पूर्व, थोबल, बिष्णुपूर आणि ककचिंग या पाच जिल्ह्यांमध्ये इंटरनेट आणि मोबाइल डेटा सेवा पाच दिवसांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. मैतेई समुदायाच्या अरामबाई तेंगगोलमधील नेत्याच्या अटकेनंतर मैतेई समुदायाचे लोक रस्त्यावर उतरले आहेत आणि या अटकेचा विरोध केला जात आहे. 

नक्की वाचा - ('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय आहे अरामबाई तेंगगोल? याचं काम काम काय असतं? यावरुन का झालाय वाद? 

अरामबाई तेंगगोल वास्तवात एक मैतेई कट्टरपंथी समूह आहे. या समूहाची स्थापना त्या राज्याचे तत्कालीन राजा आणि राज्यसभा सदस्य लेशेम्बा सानाजाओबा यांनी केली होती. आजही ते याचे अध्यक्ष आहेत. अरामबाई तेंगगोलला कट्टरपंथी गट किंवा कट्टरपंथी सशस्त्र मिलिशिया म्हणून लेबल लावले जातं. या संघटनेचा उद्देश मैतेई समुदायामध्ये हिंदू पूर्व धर्म सनमाहीला पुन्हा स्थापिक करणं आहे. या समूहाला Leishemba Sanajaoba सह माजी मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांचा वरदहस्त आहे. 

Advertisement

2022 पासून सक्रिय...
अरामबाई तेंगगोल हे मैतेई भाषेचं नाव आहे. मैतेई भाषेत तेंगगोलचा अर्थ ट्रूप किंवा प्लाटून. अरामबाई एक प्रकारे शस्त्राचं नाव आहे. ज्याचा उपयोग मणिपूरचे राजा करीत होते. रामबाई तेंगगोल 2020 पासून सक्रीय झाले आहेत. तसं पाहता या समूहाची स्थापना सांस्कृतिक कारणासाठी झाली होती, मात्र लवकरच ही संस्था कट्टरपंथी संघटना म्हणून नावारुपास आली. 

नक्की वाचा - Explainer: चिनाब रेल्वे पूलाचं स्वप्न अखेर पूर्ण! चीन-पाकिस्तानचं का वाढलं टेन्शन? वाचा संपूर्ण माहिती

2022 मध्ये या संघटनेच्या माध्यमातून मैतेई समुदायाकडून तरुणांचं संघटन सुरू झालं. राज्यात या संघटनेला संरक्षण मिळालेलं आहे. या संघटनेचे सदस्य स्वतःला मैतेई राजांसाठी काम करणाऱ्या वीरांसारखे मानतात. या संघटनेचे सदस्य युद्धाला जाणाऱ्या तीन घोडेस्वारांचे चित्र असलेला काळा टी-शर्ट असलेला गणवेश घालतात.

मिळालेल्या माहितीनुसार, मणिपूर हिंसेदरम्यान या समूहाच्या सदस्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. जून 2023 मध्ये समूहाचे 12 युनिट्स होते, आता या युनिट्सची संख्या 60 पर्यंत पोहोचली आहे. संघटनेत एकूण सदस्यांची संख्या 60 हजारापर्यंत असल्याचं सांगितलं जात आहे. ही संघटना कुकी समुदायाच्या लोकांना टार्गेट करीत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. कुकी जनजातीच्या लोकांचा आरोप आहे की, अरामबाई तेंगगोलचे लोक त्यांच्या गावांवर हल्ला करतात.  

Advertisement