
Punjab Cricketer Heart Attack Video: पंजाबमध्ये क्रिकेट खेळताना एका खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेट खेळता खेळताच हार्ट अटॅक आल्याने तरुणाने मैदानावर जीव सोडला. पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील गुरुहरसहाई येथे घडली. ज्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना फिरोजपूरच्या हर्षया गावामध्ये घडली आहे. फिरोजपूरच्या गुरु हर्षया गावातील डीएव्ही शाळेजवळील मैदानात क्रिकेट सामना सुरू होता. हरजीत सिंग नावाचा एक फलंदाज खेळताना अगदी सामान्य दिसत होता त्याने ४९ धावा काढल्या होत्या. त्याने त्याच्या शेवटच्या चेंडूवर एक लांब शॉट मारला. चेंडू सीमा ओलांडून गेला. हरजीत सिंगने षटकार मारला पण अचानक तो काही पावले पुढे सरकताच गुडघ्यावर बसला.
दुसऱ्या टोकाला उभा असलेला फलंदाजही त्याच्यासोबत बसला जणू तो कोणाशी तरी बोलण्याचा प्रयत्न करत होता पण हरजीत सिंग अचानक बेशुद्ध पडला आणि कोसळला. त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर हरजीत सिंगला हृदयविकाराचा झटका आल्याचे स्पष्ट झाले ही घटना संपूर्ण घटना मोबाईल फोनवर रेकॉर्ड करण्यात आली. हरजीत सिंग एक व्यापारी होता आणि सुतार म्हणून काम करत होता. हरजीतच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि एक मूलगा असा परिवार आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
छक्का मारने के बाद हार्ट अटैक से मौत
— NDTV India (@ndtvindia) June 29, 2025
पंजाब : फिरोजपुर में क्रिकेट खेलते हुए युवक ने पहले जड़ा छक्का, फिर हार्ट अटैक से मौत#Punjab | #ViralVideo | #HeartAttack pic.twitter.com/3yRdgdrhsK
दरम्यान, क्रिकेटच्या मैदानावर हृदयविकाराचा झटका येण्याची ही पहिलीच घटना नाही. जून 2024 मध्ये मुंबईत अशीच एक घटना घडली होती, जिथे एका 42 वर्षीय व्यक्तीचा क्रिकेट सामन्यादरम्यान मृत्यू झाला होता. हृदयविकाराच्या झटक्याने लगेचच पीडितेला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. त्याचप्रमाणे, दुसऱ्या एका प्रकरणात बांगलादेशचा माजी क्रिकेटपटू तमीम इक्बाललाही सामन्यादरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता. ज्यानंतर त्याला तात्काळ उपचारासाठी दाखल केले गेले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world