उंदरांमुळे घरातील सामानाचं नुकसान किंवा शेतातील पिकांचं नुकसान झाल्याचं तुम्ही ऐकलं असेल. मात्र उंदारांनी 30 वर्ष जुना ब्रिज पाडल्याचं समोर आलं आहे. उंदरांच्या पोखरल्यामुळे ब्रिज सीसी स्लॅब कोसळल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या म्हणण्यानुसार, अशोक नगरमध्ये 30 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला ओव्हर ब्रिज उंदरांच्या कुरतडण्यामुळे खराब झाला होता. त्यामुळे ओव्हर ब्रिज पूर्णत: खराब झाला असून अनेक ठिकाणी खड्डेही तयार झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी ब्रिजवर मोठा खड्डा पडला होता.
(नक्की वाचा- ग्राहकांना स्वस्ताईची ढेकर, नवा भिडू येताच कोल्ड ड्रिंक्सच्या किमती झाल्या थंड)
अहवालानुसार दोन दिवसांपूर्वी शहरातील सुमारे 30 वर्षे जुन्या ओव्हर ब्रिजमध्ये मोठा खड्डा दिसला होता. काही वेळातच ओव्हर ब्रिजचे सीसी पूर्णपणे कोसळले . घटनास्थळी पोहोचलेल्या प्रशासनाला वाहतूक पूर्ववत करण्यासाठी बॅरिकेड्स उभारून वाहतूक पोलीस तैनात करावे लागले.
30 वर्षे जुन्या ओव्हर ब्रिजवर खड्ड्यांमुळे सतत वाहतूक कोंडी होत असे. या संपूर्ण प्रकरणाबाबत ब्रिज महामंडळाचे कार्यकारी अभियंता रवी शर्मा यांनी सांगितले की, वर्षानुवर्षे उंदीर आतील माती बाहेर काढून आत पोकळ निर्माण करत होते. त्यामुळे ओव्हर ब्रिजचा सीसीचा स्लॅब अचानक तुटला.
(नक्की वाचा : घरबसल्या आधार कार्ड अपडेट कसं कराल? या स्टेप्स करा फॉलो!)
ओव्हर ब्रिजच्या स्लॅबमध्ये माती भरून आतपर्यंत पाणी भरले जात असल्याचे रवी शर्मा यांनी सांगिचतं. ही माती नीट बुडल्यावर पुन्हा सीसी स्लॅब टाकला जाईल. पण उंदीर पुन्हा त्यात जाणार नाहीत यासाठी काचेचे तुकडे भरले जातील, असंही शर्मा यांनी सांगितलं.