राहुल गांधींची अमेरिकेतून RSS वर वादग्रस्त टीका, भाजपानं दिला इंदिरा गांधींचा दाखला... प्रकरण काय?

Rahul Gandhi in America : राहुल गांधी मोदी सरकार, भाजपा तसंच भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. राहुल गांधी यांनी केलेल्या या टीकेला भाजपानंही उत्तर दिलं आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

Rahul Gandhi in America : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठात त्यांनी तेथील विद्यार्थी आणि भारतीय नागरिकांशी संवाद साधला. या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी मोदी सरकार, भाजपा तसंच भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. राहुल गांधी यांनी केलेल्या या टीकेला भाजपानंही उत्तर दिलं आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

RSS वर काय म्हणाले राहुल?

राहुल गांधी यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) वर टीका करताना म्हणाले की, 'भारत हा एक विचार आहे, अशी संघाची समजूत आहे, तर भारतामध्ये विचारांची विविधता असल्याचं काँग्रेस मानतं, हा खरा लढा आहे. 

यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. त्याचा उल्लेख करत म्हणाले की, 'लोकसभा निवडणुकींच्या निकालानंतर काही मिनिटांमध्येच भाजपाची भीती संपुष्टात आली आहे. आता भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुणीही घाबर नाही. ही मोठी उपलब्धी आहे. राहुल गांधी किंवा काँग्रेस नाही तर भारतीय जनतेनं संविधानावरील हल्ला मान्य केला नाही,' असं त्यांनी सांगितलं. 

या कार्यक्रमात विद्यार्थींनी राहुल गांधी यांना भारतामध्ये महिला कामगारांच्या कमी सहभागाबद्दल प्रश्न विचारला, त्याला उत्तर देताना त्यांनी भारतीय पुरुषांच्या महिलांबद्दलच्या वाईट दृष्टीकोणाकडं लक्ष वेधलं. भारतामधील बहुसंख्य पुरुषांचा महिलांबाबतचा दृष्टीकोन हा चुकीचा आहे. पुरुषांची महिलांबाबतची मनोवृत्ती बदलण्याची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं.  

( नक्की वाचा 'मिस इंडियाच्या यादीत एकही दलित, आदिवासी, OBC नाही'; राहुल गांधींचा दावा - भाजपचा जोरदार हल्ला  )

राहुल गांधी यांनी यावेळी भाजपा आणि संघाची महिलांबाबतच्या विचारधारेवर कडवट टीका केली. 'महिलांची भूमिका एकाच जबाबदारीपुरती मर्यादीत हवी, असं भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाटतं. त्यांनी घरामध्ये राहावं, स्वयंपाक करावा, जास्त बोलू नये असं त्यांचं मत आहे. तर महिलांना त्यांना हवं ते करु द्यावं अशी आमची भूमिका आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. 

( नक्की वाचा : पाकिस्तान सैन्याची सार्वजनिक कबुली, 25 वर्षांनंतर कारगिल युद्धातील सहभाग मान्य )

देशद्रोहींना भारत समजणारच नाही

केंद्रीय मंत्री गिराराज सिंह यांनी राहुल गांधींच्या टीकेला उत्तर दिलं आहे. 'राहुल गांधी यांना त्यांच्या आजींच्या आरएसएस बाबतच्या भूमिकेबाबत विचारण्याची सोय असेल तर त्यांनी तसं करावं, किंवा इतिहााची पानं चाळून पाहावी.  राहुल गांधी फक्त भारताची बदनामी करण्यासाठी विदेश यात्रा करतात, असं वाटतं. त्यांना आयुष्यात कधीही आरएसएस समजणार नाही. एका देशद्रोहीला आरएसएस कधीही समजणार नाही. जे लोकं देशावर टीका करण्यासाठीच विदेशात जातात त्यांना हे कधीही समजणार नाही,' असं सिंह यांनी सांगितलं. 
 

Topics mentioned in this article