जाहिरात

'मिस इंडियाच्या यादीत एकही दलित, आदिवासी, OBC नाही'; राहुल गांधींचा दावा - भाजपचा जोरदार हल्ला 

राहुल गांधींच्या या वक्तव्यावर भाजपकडून टीका केली जात आहे.

'मिस इंडियाच्या यादीत एकही दलित, आदिवासी, OBC नाही'; राहुल गांधींचा दावा - भाजपचा जोरदार हल्ला 
नवी दिल्ली:

लोकसभेचा विरोधी पक्ष नेता राहुल गांधी प्रयागराज दौऱ्यादरम्यान संविधान सन्मान आणि संरक्षणाच्या कार्यक्रमात सामील झाले होते. यावेळी ते म्हणाले, 90 टक्के लोक व्यवस्थेचा भाग नाहीत. यात अल्पसंख्याकाचाही समावेश आहे. मी मिस इंडियाची यादी काढली होती. मला वाटलं त्या यादीत एखादी दलित किंवा आदिवासी महिला तरी असेलच.

मात्र प्रत्यक्षात त्या यादीत एकही दलित, आदिवासी, ओबीसी महिला नव्हती. मीडिया, फिल्म इंडस्ट्री आणि मिस इंडिया बनलेल्या 90 टक्के लोकांची नेमकी संख्या कळायला हवी. संविधान 10 टक्के वर्गाने नाही तर 100 टक्के वर्गासाठी बनवले आहे. 

राहुल गांधींच्या या वक्तव्यावर भाजपकडून टीका केली जात आहे. यावर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी म्हणाले, त्यांचं वक्तव्य विभाजनकारी आणि खोटं आहे. यावेळी भाजपच्या नेत्याने सवाल केला की, लोक फोटोंमध्ये एससी, एसटी किंवा ओबीसी समुदायाच्या व्यक्तीला शोधू शकतात का?
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com