Rahul Gandhi News : राहुल गांधी भारतीय आहेत की ब्रिटीश? आज होणार फैसला

भाजप नेत्याच्या आरोपानंतर राहुल गांधी यांचा नागरिकत्वाचा मुद्दा न्यायालयात पोहोचला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावरुन अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात सुरू असलेल्या प्रकरणात आज निर्णय येऊ शकतो. या प्रकरणात 21 एप्रिल रोजी सुनावणी झाली होती. राहुल गांधी भारतीय आहेत की ब्रिटीश नागरिक यावर अलाहाबाद उच्च न्यायालयात खटला सुरू आहे. गेल्या सुनावणीत न्यायालयाने केंद्र सरकारला म्हटलं, राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही हे त्यांनीच सांगावं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

1 जुलै 2024 रोजी याचिका केली होती दाखल

गेल्या सुनावणीत एडिशनल सॉलिसिटर जनरल सूर्यभान पांडेय यांनी केंद्राकडून स्थिती रिपोर्ट दाखल केला होता. मात्र कोर्टाने ते अपुरं असल्याचं सांगतल कडक इशारा दिला होता. 1 जुलै 2024 रोजी कर्नाटकचे वकील आणि भाजप नेता एस विग्नेश शिशिर यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. यामध्ये त्यांनी राहुल गांधी यांच्याकडे ब्रिटीश नागरिकत्व असल्याचा आरोप केला होता. 

नक्की वाचा - Rahul Gandhi: 'त्यावेळी मी नव्हतो, पण...', शिख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठं वक्तव्य

काय आहे प्रकरण?

याचिकाकर्ते विग्नेश शिशिर यांनी ब्रिटीश सरकारच्या 2022 च्या गोपनीय मेलचा हवाला देत हा आरोप केला होता. विग्नेशन शिशिर यांनी भारतीय नागरिकत्व अधिनियम 1955 चे कल 9 (2) अंतर्गत राहुल गांधी यांचं भारतीय नागरिकत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. कर्नाटकचे राहणारे विग्नेश शिशिर यांनी याचिका दाखल करताना असा दावा केला आहे की, राहुल गांधी यांनी ब्रिटेनमधील एका कंपनीत संचालक पदावर होते, यावेळी त्यांनी स्वत:ला ब्रिटीश नागरिक असल्याचं सांगितलं होतं. याचिकाकर्त्याने निवडणूक आयोगाच्या दिशा-निर्देशांचा हवाला देत सांगितलं की, दोन देशांचं नागरिकत्व असलेली व्यक्ती निवडणूक लढवू शकत नाही.