CJP Protest: मोदींच्या घराबाहेर राहुल- प्रियंकांचा ठिय्या! खरगे-पवार ही सहभागी, केंद्रीय मंत्री भेटीला आले अन्

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. दोन्ही सभागृहात विरोधकांनी सरकारची कोंडी केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्यामुळे विरोधी पक्षांनी संसदेत सरकारची कोंडी केली
  • राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी पंतप्रधानांच्या निवासाबाहेर ठिय्या आंदोलन
  • पंतप्रधान निवासाजवळ वाढत्या तणावामुळे अतिरिक्त निमलष्करी दल तैनात करण्यात आले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
नवी दिल्ली:

जंतर-मंतर येथे निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला करण्यात आला. या निषेधार्थ विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. आधी विरोधकांनी लोकसभेचे कामकाज ठप्प पाडलं. त्यानंतर विरोधकांनी आपला मोर्चा जंतर-मंतरकडे वळवला. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी खासदार व प्रमुख नेत्यांसह थेट पंतप्रधान लोक कल्याण मार्ग येथील निवासाकडे मोर्चा काढला. त्यानंतर पंतप्रधानांच्या निवासस्थाना बाहेरील रस्त्यावरच धरणे आंदोलन सुरू केले. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान निवासाबाहेर अतिरिक्त निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. दोन्ही सभागृहात विरोधकांनी सरकारची कोंडी केली आहे. तर सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी सभागृहाबाहेर सरकार विरोधात आवाज बुलंद केला आहे. त्यामुळे सरकारची दोन्ही बाजूने कोंडी झाल्याची स्थिती पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर सरकारवर जोरदार हल्ला चढवला. "विद्यार्थ्यांवर झालेल्या क्रूर कारवाईबाबत पंतप्रधान मोदींनी उत्तर दिले पाहिजे. सरकार संसदेत या विषयावर चर्चा टाळत आहे. देशातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केल्याबद्दल पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे," अशी थेट मागणी त्यांनी केली आहे. 

Advertisement

नक्की वाचा - 'हे पाप करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे'; NEET पेपरफुटीवर PM मोदींचं मोठं वक्तव्य

यानंतर विरोधी पक्षाचे सर्व खासदार जंतरमंतरच्या दिशेने गेले. राहुल गांधीच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. यात विरोधी पक्षाचे खासदार सहभागी झाले होते. जंतर-मंतरच्या दिशेने कूच करत असताना पोलिसांनी अनेक नेत्यांना ताब्यात घेतले गेले. यावेळी विरोध दर्शवण्यासाठी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी आपले हात नायलॉनच्या दोरीने बांधले होते. पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि खासदार सुखजिंदर सिंह रंधावा यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मोदींच्या घरा बाहेर ठिय्या आंदोलन केले. त्यांना तिथून हटवण्याचा प्रयत्न केला. पण ते आंदोलनावर ठाम राहीले. 

नक्की वाचा - Success Story: आई नंबर वन, मुलगीही अव्वल! एकाच घरात दोन धमाके, आईसह लेकीची भन्नाट कामगिरी

या आंदोलनात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार ही सहभागी झाले होते. परिस्थिती यावेळी तणावाची झाली होती. यातून मार्ग काढण्यासाठी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे राहुल गांधी यांच्या भेटीसाठी गेले. यावेळी दोन्ही नेत्यामध्ये चर्चा झाली. राहुल गांधी यांनी आपण ठिय्या आंदोलनावर ठाम असल्याचं सांगितलं. शिवाय धर्मेंद्र प्रधान यांनी राजीमामा दिलाच पाहीजे असं ही सांगितलं. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध ही त्यांनी यावेळी नोंदवला.