Rahul Gandhi on Operation Blue Star : 'ऑपरेशन ब्लू स्टार ही चूक'; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

ऑपरेशन ब्ल्यू स्टार हा भारतीय इतिहासातील एक वादग्रस्त आणि महत्त्वाचा प्रसंग मानला जातो.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल गांधी यांनी केलेलं वक्तव्य सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. अमेरिकेच्या ब्राऊन विद्यापीठातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. पंजाबमधील ऑपरेशन ब्लू स्टार ही चूक होती. इतिहासात काँग्रेसने ज्या चुका केल्यात त्याची मी जबाबदारी घेतो असंही ते पुढे म्हणाले. राजकीय वर्तुळातून या वक्तव्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पंजाबमधील ऑपरेशन ब्लू स्टार ही राजकारणातील महत्त्वाच्या घटनांपैकी एक आहे. सरकारने धार्मिक ठिकाणी घुसून कारवाई केल्यामुळे इंदिरा गांधींना जीव गमवावा लागला होता. ऑपरेशन ब्लू स्टारमुळे शीखमधील कट्टरपंथीयांच्या मनात क्रोध होता. त्याचाच परिणाम इंदिरा गांधीच्या हत्येतून समोर आला. 

राहुल गांधींवर निशाणा...

भाजप नेते परिणय फुले यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. याआधीच काँग्रेसच्या पापासाठी माफी मागायला हवी होती. जेव्हा राजकारणात आले खासदार झाले तेव्हा माफी मागायला हवी होती. आज लोक नाराज आहेत, काँग्रेसला रामराम ठोकत आहेत. अशा पडत्या काळात राजकीय फायद्यासाठी राहुल गांधींनी माफी मागितली, त्यामुळे याचा मी निषेध करतो.

Advertisement

नक्की वाचा - Rahul Gandhi News : राहुल गांधी भारतीय आहेत की ब्रिटीश? आज होणार फैसला


ऑपरेशन ब्ल्यू स्टार काय आहे?

  • 1970-80 च्या दशकात पंजाबमध्ये खलिस्तान चळवळीमुळे हिंसाचार वाढला होता
  • भिंद्रनवाले आणि त्यांच्या समर्थकांनी सुवर्णमंदिरातून आपले कार्य चालवले होते, ज्यामुळे परिस्थिती गंभीर 
  • ऑपरेशन ब्ल्यू स्टार हा भारतीय लष्कराने 1 जून ते 8 जून 1984 दरम्यान पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्णमंदिरात राबवलेली लष्करी कारवाई 
  • उद्देश खलिस्तान चळवळीचे नेते जरनैल सिंग भिंद्रनवाले आणि त्यांच्या सशस्त्र समर्थकांना हटवणे आणि तिथे साठवलेली शस्त्रास्त्रे जप्त करणे हा होता 
  • भारत सरकारच्या आदेशानुसार पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली कारवाई 
  • लष्कराने सुवर्णमंदिर परिसराला घेराव घालून भिंद्रनवाले आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध कारवाई केली. यात टँक आणि तोफांचा वापर झाला.
  • यात भिंद्रनवाले आणि अनेक समर्थक मारले गेले. मात्र, यामुळे मोठ्या प्रमाणात नागरी आणि लष्करी मृत्युमुखी पडले
  • यामध्ये सुवर्णमंदिराचे नुकसान झाले
  • अधिकृत आकडेवारीनुसार 493 नागरिक आणि 83 सैनिक मारले गेले 
  • ही कारवाई शीख समुदायासाठी अत्यंत संवेदनशील ठरली, कारण सुवर्णमंदिर हे शीखांचे पवित्र स्थळ आहे 
  • देशभरात तणाव वाढला आणि पंजाबमध्ये दहशतवाद वाढला 
  • कारवाईच्या परिणामस्वरूप इंदिरा गांधी यांची 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्या शीख अंगरक्षकांनी हत्या केली.
  • ऑपरेशन ब्ल्यू स्टार हा भारतीय इतिहासातील एक वादग्रस्त आणि महत्त्वाचा प्रसंग मानला जातो.