Raihan Vadra : क्रिकेटच्या मैदानात अपघात, एका डोळ्याची दृष्टी गमावली;कोण आहे प्रियांका गांधींचा मुलगा रेहान?

Raihan Vadra Engagement: काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा रेहान वाड्रा सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Raihan Vadra Engagement: काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचा मुलगा रेहान वाड्राचा साखरपुडा झाला आहे.
मुंबई:

Raihan Vadra Engagement: काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा रेहान वाड्रा सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. रेहानची त्याची मैत्रीण अवीवा हिच्यासोबत साखरपुडा झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत. गांधी घराण्यातील हा तरुण वारसदार नक्की काय करतो आणि त्याचे शिक्षण काय झाले आहे, याबद्दल आता सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली आहे.  अद्याप वाड्रा कुटुंबाकडून या सगाईबाबत अधिकृत दुजोरा देण्यात आला नसला, तरीही सर्वांनाच रेहानबद्दल जाणून घेण्याची मोठी उत्सुकता आहे. 

रेहान वाड्राचे बालपण आणि शिक्षण

रेहान वाड्रा सध्या 25 वर्षांचा असून त्याचा कल राजकारणापेक्षा कला क्षेत्राकडे अधिक असल्याचे दिसून येते. त्याने आपले शालेय शिक्षण डेहराडूनमधील प्रसिद्ध दून स्कूलमधून पूर्ण केले आहे. 

विशेष म्हणजे त्याचे आजोबा राजीव गांधी आणि मामा राहुल गांधी यांनीही याच शाळेतून शिक्षण घेतले होते. शालेय शिक्षणानंतर रेहानने उच्च शिक्षणासाठी लंडन गाठले. तिथे त्याने लंडनमधील प्रसिद्ध SOAS युनिव्हर्सिटीमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे.

( नक्की वाचा : बांगलादेशात घरांना बाहेरून कुलूप लावून हिंदूंना जिवंत जाळण्याचा प्रयत्न; अंगावर शहारे आणणारी घटना, पाहा VIDEO )

फोटोग्राफी आणि कलेची आवड

गांधी कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणे राजकारणात रस न दाखवता रेहानने फोटोग्राफी आणि व्हिज्युअल आर्टिस्ट म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. वयाच्या अवघ्या 7 व्या वर्षी प्रियांका गांधी यांनी त्याला पहिला कॅमेरा दिला होता. तेव्हापासून त्याला या क्षेत्राची आवड निर्माण झाली. 

Advertisement

जिम कॉर्बेट आणि रणथंबोर सारख्या राष्ट्रीय उद्यानांमध्ये फिरताना त्याने वाइल्ड लाइफ फोटोग्राफीचे धडे गिरवले. तो केवळ छंद म्हणून नाही तर व्यावसायिक स्तरावर सुद्धा फोटोग्राफी करतो.

Advertisement

आयुष्यातील मोठे संकट आणि जिद्द

रेहानच्या आयुष्यात 2017 मध्ये एक कठीण प्रसंग आला होता. शाळेत क्रिकेट खेळत असताना त्याला दुखापत झाली आणि दुर्दैवाने त्याने त्याच्या डाव्या डोळ्याची दृष्टी गमावली. या अपघातामुळे त्याच्या उजव्या डोळ्यावरही ताण येत होता, ज्यामुळे त्याला जवळपास 2 वर्षे फोटोग्राफीपासून दूर राहावे लागले. मात्र या संकटातून सावरून त्याने 2019 मध्ये पुन्हा एकदा कॅमेरा हातात धरला आणि नव्या जोमाने  कामाला सुरुवात केली.

कला क्षेत्रातील मोठी भरारी

जुलै 2021 मध्ये रेहानने दिल्लीतील बिकानेर हाऊसमध्ये 'डार्क परसेप्शन' नावाचे आपले पहिले एकल प्रदर्शन भरवले होते. अंधारामुळे मानवी दृष्टी आणि कल्पकता कशी बदलते, हे त्याने आपल्या चित्रांमधून आणि फोटोंमधून मांडले होते. 

Advertisement

त्यानंतर 2022 मध्ये 'अनुमाना' नावाचे दुसरे प्रदर्शनही त्याने भरवले होते. रेहानला त्याचे आजोबा राजीव गांधी यांच्या फोटोग्राफीच्या कामातून मोठी प्रेरणा मिळते. तो पॉल कॉकसेज आणि बँक्सी सारख्या जागतिक दर्जाच्या कलाकारांच्या कामाचा मोठा फॅन आहे.

Topics mentioned in this article