जाहिरात

बांगलादेशात घरांना बाहेरून कुलूप लावून हिंदूंना जिवंत जाळण्याचा प्रयत्न; अंगावर शहारे आणणारी घटना, पाहा VIDEO

Horrific Attack on Hindus in Bangladesh: हल्लेखोरांनी क्रूरतेचा कळस गाठत घरातील लोक बाहेर येऊ नयेत म्हणून दरवाजांना बाहेरून कड्या लावून घेतल्या होत्या.

बांगलादेशात घरांना बाहेरून कुलूप लावून हिंदूंना जिवंत जाळण्याचा प्रयत्न; अंगावर शहारे आणणारी घटना, पाहा VIDEO

Horrific Attack on Hindus in Bangladesh:  बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू समाजावर होणाऱ्या हल्ल्यांची मालिका सुरुच आहे. पिरोजपुर जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. येथे उपद्रवी घटकांनी हिंदूंच्या 5 ते 6 घरांना लक्ष्य करत त्यांना आग लावून दिली. ही घटना घडली तेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य गाढ झोपेत होते. हल्लेखोरांनी क्रूरतेचा कळस गाठत घरातील लोक बाहेर येऊ नयेत म्हणून दरवाजांना बाहेरून कड्या लावून घेतल्या होत्या.

या भीषण परिस्थितीतून कुटुंबातील सदस्यांनी कसाबसा आपला जीव वाचवला असला तरी, या घटनेने बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

काय आहे प्रकरण?

ही भयंकर घटना पिरोजपुर जिल्ह्यातील डुमरीतला गावात 27 डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली. काही दिवसांपूर्वीच हिंदू युवक दीपू चंद्र दास याची निर्घृण हत्या करून त्याला जाळल्याची घटना ताजी असतानाच ही नवीन घटना समोर आली आहे. गावातील साहा कुटुंबासाठी ती रात्र एखाद्या भीषण स्वप्नासारखी ठरली. 

मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी पूर्ण नियोजित कट रचून घरांना घेराव घातला होता. त्यांनी घराच्या खोल्यांमध्ये कपडे कोंबून आग लावली आणि लोक बाहेर पळू नयेत यासाठी दरवाजांना बाहेरून कुलूप लावून घेतले. कुटुंबातील सदस्यांना जाग आली, तेव्हा त्यांचे घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते.

( नक्की वाचा : Operation Sindoor : पाकिस्ताने अखेर गुडघे टेकले! Nur Khan एअरबेसवरील भारतीय हल्ल्याची दिली कबुली )

मृत्यू डोळ्यासमोर दिसत होता!

ज्यावेळी घरांना आग लावण्यात आली, त्यावेळी दोन घरांमध्ये मिळून हिंदू कुटुंबातील एकूण 8 सदस्य उपस्थित होते. घराच्या आत आगीच्या ज्वाळा धधकत होत्या आणि बाहेर पडण्याचे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. अक्षरशः मृत्यू डोळ्यासमोर दिसत असताना या सदस्यांनी प्रचंड धाडस दाखवले. 

त्यांनी घरातील पत्रे आणि बांबूचे कुंपण तोडून कसाबसा आपला मार्ग काढला आणि बाहेर धाव घेतली. या आठ जणांचे प्राण थोडक्यात वाचले असले तरी, त्यांचे घर आणि घरात असलेले सर्व सामान जळून खाक झाले आहे. आता हे कुटुंब उघड्यावर आले आहे.

( नक्की वाचा : Nostradamus: 2026 मध्ये मृत्यू बनून येणार मधमाश्या? नास्त्रेदमसच्या त्या एका भविष्यवाणीने वाढवली जगाची धडधड )
 

या भीषण हल्ल्यानंतर साहा कुटुंब प्रचंड दहशतीखाली आहे. त्यांच्या मनात इतकी भीती आहे की ते प्रसारमाध्यमांशी बोलायलाही तयार नाहीत. माध्यमांनी जेव्हा त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला, तेव्हा त्यांनी भीतीपोटी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. 

आग कशी लागली हे आम्हाला माहित नाही, असे सांगून त्यांनी आपली हतबलता व्यक्त केली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये स्थानिक लोक आग विझवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

पोलिसांनी काय कारवाई केली?

घटनेची माहिती मिळताच पिरोजपुरचे पोलीस अधीक्षक मोहम्मद मंजूर अहमद सिद्दीकी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पीडित कुटुंबाची विचारपूस केली आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. 

पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 5 संशयितांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे. बांगलादेशातील या अस्थिर परिस्थितीमुळे स्थानिक हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com