Railway Recruitment 2024: रेल्वेत होणार 14 हजार जागांची भरती, कशी मिळवणार नोकरी? A to Z माहिती

Railway Recruitment 2024: देशात सर्वात जास्त जणांना रोजगार देणाऱ्या भारतीय रेल्वेमध्ये 14 हजारांपेक्षा जास्त जागांची भरती होणार आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

Railway Recruitment 2024: देशात सर्वात जास्त जणांना रोजगार देणाऱ्या भारतीय रेल्वेमध्ये मोठी भरती होणार आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डानं (RRB) काही दिवसांपूर्वी टेक्निशियन पदांच्या भरतीचे नोटिफिकेशन प्रसिद्ध केले होते. आरआरबीनं यामध्ये आणखी 5254 पदांची संख्या वाढवली आहे. त्यामुळे आता रेल्वेमध्ये आरआरबी टेक्निशियन भर्तीच्या अंतर्गत तब्बल 14298 पदांची भरती होणार आहे. 

आरआरबी टेक्निशियन भरती 2024 ची अर्ज प्रक्रिया 9 मार्च ते 8 एप्रिल 2024 पर्यंत सुरु होती. आता या भरतीसाठी आरआरबी पुन्हा एकदा प्रक्रिया राबवणार आहे. त्याबाबतचे नोटिफिकेशन लवकरच काढले जाईल. या पदासाठी इच्छूक आणि योग्य उमेदवार indianrailways.gov.in या रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज करु शकतील.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

Railway Recruitment 2024: कोणते उमेदवार होणार पात्र?

टेक्निशियन ग्रेड 1 पदासाठी कोणतीही मान्यता प्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून बीई, बीटेक किंवा बीएससी इंजिनिअरिंगची डिग्री आवश्यक आहे. टेक्निशियन ग्रेड 3 साठी उमेदवारानं मान्यताप्राप्त बोर्डातून 10 ची परीक्षा उत्तीर्ण असणे आणि त्याच्याकडं आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 

Railway Recruitment 2024: काय आहे वयोमर्यादा?

रेल्वे टेक्निशयन पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारे किमान वय 18 वर्ष आणि कमाल वय 36 असावे. 1 जुलै 2024 या तारखेच्या आधारावर हे वय निश्चित केले जाईल. राखीव गटातील उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये सूट मिळेल. 

Advertisement

( नक्की वाचा : कशी असते UPSC परीक्षा? सरकारी अधिकारी होण्यासाठी काय करावं लागतं? )
 

Railway Recruitment 2024: अर्ज भरण्यसाठी शुल्क

आरआरबी टेक्निशियन पदासाठी इच्छूक सामान्य आणि ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावे लागेल. तर राखीव श्रेणीतील उमेदवारांना 250 रुपये शुल्क द्यावे लागेल. हे शुल्क  डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग या ऑनलाईन पद्धतीनं भरावं लागेल.

Railway Recruitment 2024:  निवड प्रक्रिया

आरआरबी टेक्निशियन पदासाठी योग्य उमेदवारांची निवड सीबीटी म्हणजेच कॉम्पुटर बेस्ड मोड परीक्षेच्या आधारे होईल. ही परीक्षा उतीर्ण होणाऱ्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी, तसंच मेडिकल परीक्षेच्या आधारे निवड केली जाईल.

Advertisement