जाहिरात
Story ProgressBack

कशी असते UPSC परीक्षा? सरकारी अधिकारी होण्यासाठी काय करावं लागतं?

आयएएस (IAS), आयपीएस (IPS) किंवा आयएफएस (IFS) या सरकारी नोकरीतील टॉपच्या तीन पोस्ट मिळवण्यासाठी यूपीएससी परीक्षा पास होणं आवश्यक आहे.

Read Time: 2 min
कशी असते UPSC परीक्षा? सरकारी अधिकारी होण्यासाठी काय करावं लागतं?
मुंबई:

UPSC CSE Exam 2024 Date: संघ लोक सेवा आयोगाकडून (Union Public Service Commission) आयोजित करण्यात येणारी यूपीएससीची परीक्षा (UPSC Exam) देशातच नाही तर जगातील खडतर परिक्षांपैकी एक मानली जाते. त्यानंतरही देशभरातून लाखो तरुण दरवर्षी ही परीक्षा देतात. सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही परीक्षा पास होणं आवश्यक असतं. आयएएस (IAS), आयपीएस (IPS) किंवा आयएफएस (IFS) या सरकारी नोकरीतील टॉपच्या तीन पोस्ट मिळवण्यासाठी यूपीएससी परीक्षा (UPSC Civil Service Exam) पास होणं आवश्यक आहे. 

अनेकदा तरुणांना एखाद्या कार्यक्षम सरकारी अधिकाऱ्याला भेटून त्यांच्यासारखं होण्याची प्रेरणा मिळते. त्याचबरोबर सिनेमा, जाहिरातींपासून प्रभावित होऊनही अनेक तरुण ही परीक्षा देतात. काही महिन्यांपूर्वी 12th Fail हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. आयपीएस अधिकारी मनोज शर्मा यांच्या आयुष्यावर हा सिनेमा आधारित आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतरही अनेक तरुणांना यूपीएससी परीक्षा देण्याची प्रेरणा मिळली. ही परीक्षा कशी द्यायची? या परीक्षेचे किती टप्पे असतात? या सर्वांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. 

किती टप्पे आहेत?

यूपीएससी परीक्षा तीन टप्प्यात होते. पूर्व परीक्षा म्हणजेच प्रीलिम्स हा पहिला टप्पा असतो. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुख्य परीक्षा (मेन्स) द्यावी लागते. त्यानंतर तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात उमेदवाराच्या व्यक्तिमत्वाची चाचणी घेण्यासाठी मुलाखत घेतली जाते.

सनदी अधिकारी होण्यासाठी या तीन्ही परीक्षा सलग प्रयत्नात यशस्वी होणे आवश्यक आहे. यापैकी कोणत्याही टप्प्यात नापास झाल्यानंतर तुम्हाला त्यावर्षीच्या स्पर्धेतून बाहेर पडावं लागतं.  

पहिल्या टप्प्यात दोन पेपर होतात. हे दोन्ही पेपर वस्तूनिष्ठ (ऑब्जेक्टिव्ह) असतात. यामधील पहिला पेपर जीएस म्हणजेच जनरल स्टडीज (सामान्य अध्यन) हा असतो. तर दुसरा पेपर सीसॅटचा असतो. यामध्ये गणित, इंग्रजीसह अन्य विषय असतो. हा पात्र होण्यासाठी पेपर असतो. तर दुसऱ्या पेपरच्या आधारावर रँकिंग ठरतं.  

दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच मुख्य परीक्षेत जीएससह वेगवेगळे विषय असतात. त्यामध्ये भूगोल, इतिहास, राज्य शास्त्र, विज्ञान यासारख्या वेगवेगळ्या विषयांचे पेपर असतात. त्याचबरोबर एक वैकल्पिक पेपरही असतो. या टप्प्यात उत्तीर्ण झालेला विद्यार्थी तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी पात्र होतात. त्यामध्ये तुमच्या व्यक्तिमत्वाची चाचणी होते. त्यानंतरच तुम्ही सनदी अधिकारी होऊ शकता. 

पात्रता आणि संधी

यूपीएससी परीक्षा देण्यासाठी शैक्षणिक पात्रतेसोबतच वयोमर्यादेचीही मूदत असते. त्यामुळे कोणत्या उमेदवाराला किती वेळा ही परीक्षा देता येते हे देखील याचा अभ्यास सुरु करण्यापूर्वी माहिती असणे आवश्यक आहे. ही परीक्षा देण्यासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त संस्था किंवा विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

सामान्य श्रेणीतील (General Category) 32 वर्षांपर्यंत ही परीक्षा देता येते. त्यामध्ये त्यांना 6 अटेम्पट असता. ओबीसी वर्गातील उमेदवाराला 35 वयोमर्यादा असून 9 अटेम्प्ट आहेत. तर एससी आणि एसटी वर्गातील उमेदवारांना 37 व्या वर्षापर्यंत ही परीक्षा देता येते. त्यांना अटेम्पट्सची मर्यादा नाही.  
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination