Raja Raghuvanshi Case : मेघालयात हनिमूनसाठी गेलेले मध्ये प्रदेशमधील राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथून पत्नी सोनम रघुवंशीला ताब्यात केली आहे. पोलिसांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार, गाजीपूरमधील एका ढाब्यात सोनम रघुवंशी सापडली आहे. या प्रकरणात आणखी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. मेघालय पोलीस महासंचालकांनी दावा केला आहे की प्रकरणात 4 जणांना अटक करण्यात आली आहे. सोनम हत्येत सहभागी होती की तिने राजाची सुपारी दिली होती, हे पोलीस तपासत समोर येईल.
राजा रघुवंशी प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं?
22 मे 2025
राजा आणि सोनम रघुवंशी शिलॉंग येथील एका हॉटेलमध्ये दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांना हॉटेलच्या रिसेप्शनवर दिसले. त्याच संध्याकाळी त्यांनी हॉटेलमधून चेक-आउट केले आणि दुसऱ्या हॉटेलकडे रवाना झाले. त्यांनी आपले सामान सोहरा येथील हॉटेलमध्ये ठेवले आणि माउलकाया गावाच्या दिशेने निघाले. यानंतर त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.
23 मे 2025
सोनम आणि राजा यांनी त्यांच्या कुटुंबियांशी शेवटचा संपर्क साधला. ते हायकिंगसाठी निघाले होते आणि त्यांनी स्कूटर भाड्याने घेतली होती. याच दिवशी ते बेपत्ता झाले. त्यांच्याशी संपर्क तुटला आणि त्यांचा फोन बंद झाला.
24 मे 2025
सोनम आणि राजा यांनी भाड्याने घेतलेली स्कूटर सोहरारिम येथे रस्त्याच्या कडेला बेवारस अवस्थेत सापडली. यामुळे त्यांच्या बेपत्ता होण्याबाबत चिंता वाढली आणि पोलिसांनी तपास सुरू केला.
2 जून 2025
मेघालय पोलिसांनी ड्रोनच्या साहाय्याने वेसॉडॉन्ग येथील एका खोल दरीत राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला. मृतदेहाजवळ एक मोठा चाकू सापडला, जो खुनाचा हत्यार असल्याचा संशय होता. पोस्टमॉर्टम अहवालाची प्रतीक्षा आहे. राजा यांचा फोनही याच ठिकाणी सापडला.
4 जून 2025
मेघालय पोलिसांनी राजा यांच्या खुनाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केली. आहेत.
5 जून 2025
सोहरा येथील मॉक्मा रोडवरील एडी व्ह्यूपॉइंट, मकमा गावात पोलिसांना एक ओला रेनकोट सापडला.
9 जून 2025
गाजीपूरमधील एका ढाब्यात सोनम रघुवंशी सापडली.