Rajasthan School Collapse : सरकारी शाळेची इमारत कोसळून 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 35 हून अधिक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Rajasthan School Collapse : ढिगाऱ्याखालून आतापर्यंत ८ मुलांना बाहेर काढण्यात यश आले आहे. जखमी मुलांना जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, गंभीर जखमी मुलांना झालावाड येथील मोठ्या रुग्णालयात रेफर करण्यात येत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • राजस्थान के झालावाड़ में सरकारी स्कूल की बिल्डिंग गिरने से 4 बच्चों की मौत हो गई है. हादसा पीपलोदी गांव का है.
  • रेस्क्यू कार्य जारी है. ग्रामीणों, स्कूल स्टाफ और टीचर्स की मदद से बच्चों को मलबे से बाहर निकाला जा रहा है.
  • घायल बच्चों का इलाज मनोहर थाना अस्पताल में किया जा रहा है और उनके परिजन भी अस्पताल पहुंचे हैं.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली? आम्हाला नक्की कळवा.

Rajasthan Jhalawar School Collapse : सरकारी शाळेची इमारत कोसळल्याने ४ शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर ४० हून अधिक मुले ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यातील दांगीपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील पिपलोदी गावातून आज शुक्रवारी ही घटना घडली आहे. घटनस्थली सध्या बचावकार्य सुरू आहे.

घटना घडली त्यावेळी शाळेत ५० च्या आसपास मुले उपस्थित होती. आठवीपर्यंतची शाळा आहे. घटनेची माहिती मिळताच, गावातील लोक तात्काळ घटनास्थळी धावले आणि त्यांनी बचाव कार्य सुरू केले. प्रशासकीय अधिकारीही तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत. ढिगारा हटवण्यासाठी आणि मुलांना बाहेर काढण्यासाठी ४ जेसीबीमशीनचा वापर केला जात आहे. जिल्हाधिकारीही घटनास्थळी रवाना झाले आहेत.

आठ मुलांना ढिगाळ्याखालून काढण्यात यश

ढिगाऱ्याखालून आतापर्यंत ८ मुलांना बाहेर काढण्यात यश आले आहे. जखमी मुलांना जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, गंभीर जखमी मुलांना झालावाड येथील मोठ्या रुग्णालयात रेफर करण्यात येत आहे. रुग्णालयात मुलांचे पालकही मोठ्या संख्येने पोहोचले आहेत.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेची इमारत खूप जुनी होती आणि बऱ्याच काळापासून ती जीर्ण अवस्थेत होती. इमारत जुनी असूनही तिची दुरुस्ती करण्यात आली नव्हती. शुक्रवार सकाळी अचानक शाळेचे छत कोसळले, त्यावेळी शाळेत मुले उपस्थित होती. या दुर्घटनेसाठी प्रशासनाची आणि संबंधित विभागाची उदासीनता जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.

Advertisement