खासदाराच्या मुलीने फुटपाथवर झोपलेल्या व्यक्तीला BMW कारने चिरडलं, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

राज्यसभेचे खासदार आणि बीएमआर समूहाचे संस्थापक बीडा मस्तान राव यांच्या मुलीने कथित स्वरुपात आपल्या गाडीने एका व्यक्तीला चिरडल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्य झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

पुण्यातील पोर्शे कार दुर्घटना ताजी असतानाच आणखी एक हाय प्रोफाइल व्यक्तीशी संबंधित हिट अँड रन (Hit And Run Case) प्रकरण समोर आले आहे. चेन्नईतील राज्यसभेच्या खासदाराच्या मुलीने कथित स्वरुपात फुटपाथवर झोपलेल्या व्यक्तीला बीएमडब्ल्यू कारने चिरडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेला जामीन देखील मिळाला आहे. 

वायएसआर काँग्रेस पार्टीचे राज्यसभेतील खासदार बीडा मस्तान राव यांची मुलगी माधुरी बीएमडब्ल्यू कारने प्रवास करत होती. यादरम्यान कथित स्वरुपात तिने चेन्नईतील बेसेंट नगर परिसरात फुटपाथवर झोपलेल्या 24 वर्षीय पेंटर सूर्या नावाच्या व्यक्तीला आपल्या कारने चिरडले. माधुरीसोबत तिची मैत्रिणी देखील होती. 

(ट्रेंडिंग न्यूज: जिम ट्रेनरबरोबर प्रेम, पतीची हत्या, एक वॉट्सअप मेसेज अन् 3 वर्षापूर्वीच्या खूनाचा उलगडा)

उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर माधुरीने लगेचच तेथून पळ काढला. तर तिची मैत्रीण कारमधून बाहेर आली आणि दुर्घटनेनंतर तेथील लोकांशी वाद घालू लागली. काही वेळानंतर ती देखील घटनास्थळावरून निघून गेली.  स्थानिकांनी सूर्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले, पण गंभीर स्वरुपात जखमी झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

(ट्रेंडिंग न्यूज: मर्डर मिस्ट्री! आधी शॉक मग वार, 5 पुरावे अन् अभिनेता दर्शन अडकणार?)

आठ महिन्यापूर्वीच झाले होते लग्न

सूर्याचे आठ महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. घटनेनंतर त्याच्या नातेवाईकांनी शेजाऱ्यांसह शास्त्री नगर पोलीस स्टेशन गाठलं आणि आरोपींविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केला तेव्हा संबंधित कार ही बीएमआर (बीडा मस्तान राव) समूहाची असल्याची माहिती समोर आली आणि पाँडेचेरी येथे कारची नोंदणी प्रक्रिया करण्यात आली होती. दरम्यान तक्रारीनंतर पोलिसांनी माधुरीला अटक केली. पण पोलीस स्टेशनमधूनच तिला जामीन देखील मिळाला. 

Advertisement

(ट्रेंडिंग न्यूज: वसईत भर रस्त्यात तरूणीचा खून, हत्या केल्यानंतर त्याने...)

बीडा मस्तान राव हे वर्ष 2022 साली राज्यसभेचे खासदार झाले. राव हे बीएमआर समूहाचे संस्थापक आहेत आणि हा समूह सीफूड उद्योग विश्वातील एक प्रसिद्ध नाव आहे. 

काही सेकंदाच्या प्रसिद्धीसाठी जीव गमावला, Reel बनवताना संभाजीनगरात तरुणीचा दुर्दैवी अंत