महाराष्ट्रातील तीन पोलिस अधिका-यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ प्रदान, वाचा संपूर्ण यादी

President's Police Medal : राज्यातील 17 पोलिस अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्याना ‘पोलीस शौर्य पदक’ तर 39 पोलिसांना गुणवत्तापूर्ण  सेवेसाठी ‘पोलीस पदक’ असे राज्यातील एकूण 59 पोलिसांना पदके प्रदान कण्यात आली.

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला  केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस पदके देऊन सन्मानित करण्यात आले.  महाराष्ट्रातील चिरंजीवी रामछाबिला प्रसाद, राजेंद्र बालाजीराव डहाळे, सतीश राघवीर गोवेकर या पोलिस अधिकाऱ्यांना  विश‍िष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक' प्रदान करण्यात आले.  यासह राज्यातील 17 पोलिस अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्याना ‘पोलीस शौर्य पदक' तर 39 पोलिसांना गुणवत्तापूर्ण  सेवेसाठी ‘पोलीस पदक' असे राज्यातील एकूण 59 पोलिसांना पदके प्रदान कण्यात आली.

‘राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक' आणि ‘पोलीस शौर्य पदक', जीवन आणि मालमत्ता यांचे संरक्षण, गुन्हेगारीला पायबंद आणि गुन्हेगारांना अटक करण्यासाठी उल्लेखनीय शौर्यासाठी दिले जाते. विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक'  पोलीस सेवेतील खास उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाते. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘पोलीस पदक' संसाधन आणि कर्तव्यनिष्ठेने बजावलेल्या अमूल्य सेवेसाठी प्रदान केले जाते. वर्ष 2024 च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरातील एकूण 908 पोलिस अधिकारी/ कर्मचारी यांना ‘पोलीस पदके' प्रदान करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील 59 पोलिसांचा समावेश आहे.

Advertisement

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकांमध्ये  राज्याचे चिरंजीवी रामछाबिला प्रसाद, अतिरिक्त पोलिस महासंचालक, श्री. राजेंद्र बालाजीराव डहाळे, संचालक, श्री. सतीश राघवीर गोवेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त यांचा समावेश आहे.  

Advertisement

राज्यातल्या 17 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक' प्रदान करण्यात आले. पोलीस शौर्य पदकांमध्ये डॉ. कुणाल शंकर सोनावणे - उप-विभागीय पोलीस अधिकारी, दीपक रंभाजी आवटे - पोलीस उपनिरीक्षक, कै. धनाजी तानाजी होनमाने - पोलीस उपनिरीक्षक (मरणोत्तर),  नागेशकुमार बोंड्यालू मदरबोईना - नाईक पोलीस शिपाई, शकील युसुफ शेख - पोलीस शिपाई,  विश्वनाथ सामैय्या पेंदाम - पोलीस शिपाई, विवेक मानकू नरोटे - पोलीस शिपाई,  मोरेश्वर नामदेव पोटावी - पोलीस शिपाई,  कैलाश चुंगा कुलमेथे - पोलीस शिपाई, कोटला बोटू कोरामी - पोलीस शिपाई,  कोरके सन्नी वेलादी - पोलीस शिपाई, महादेव विष्णू वानखेडे - पोलीस शिपाई, अनुज मिलिंद तारे (आयपीएस) -अतिरिक्त पोलीस अधीक्षक,  राहुल नामदेवराव देव्हाडे - पोलीस उपनिरीक्षक,  विजय दादासो सकपाळ - पोलीस उपनिरीक्षक, महेश बोरू मिच्छा - मुख्य शिपाई,  समय्या लिंगय्या आसाम - नाईक पोलीस शिपाई यांचा समावेश आहे.

Advertisement

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘पोलीस पदक' राज्यातल्या 39 पोलिसांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये  - दत्तात्रय तुळशीदास शिंदे- उपमहानिरीक्षक, संदीप गजानन दिवाण- उपमहानिरीक्षक, शिवाजी ज्ञानदेव फडतरे- उप-अधीक्षक, संजय मारुती खांदे-अधीक्षक, विनीत जयंत चौधरी-उपअधीक्षक, प्रकाश पांडुरंग गायकवाड-उपनिरीक्षक,  सदानंद जनाबा राणे- निरीक्षक, विजय मोहन हातिसकर-पोलीस सहआयुक्त, महेश मोहनराव तराडे-उप अधीक्षक, राजेश रमेश भागवत- निरीक्षक, गजानन कृष्णराव तांदूळकर- उपनिरीक्षक, राजेंद्र तुकाराम पाटील- उपनिरीक्षक, संजय साहो राणे-उपनिरीक्षक, गोविंद दादू शेवाळे-उपनिरीक्षक, मधुकर पोछा नैताम- उपनिरीक्षक, अशोक बापू होनमाने- निरीक्षक, शशिकांत शंकर तटकरे- पनिरीक्षक,अक्षयवारनाथ जोखुराम शुक्ला-उपनिरीक्षक,शिवाजी गोविंद जुंदरे- उपनिरीक्षक, सुनील लयाप्पा हांडे- सहाय्यक उपनिरीक्षक, प्रकाश मोतीराम देशमुख-उपनिरीक्षक, दत्तू रामनाथ खुळे- सहाय्यक उपनिरीक्षक, रामदास नागेश पालशेतकर- निरीक्षक (पीए), देविदास श्रावण वाघ-सहाय्यक उपनिरीक्षक, प्रकाश शंकर वाघमारे-सहाय्यक उपनिरीक्षक, संजय दयाराम पाटील- सहाय्यक उपनिरीक्षक, मोनिका सॅम्युअल थॉमस- सहाय्यक उपनिरीक्षक,बंडू बाबुराव ठाकरे- मुख्य शिपाई, गणेश मानाजी भामरे- मुख्य शिपाई,अरुण निवृत्ती खैरे- मुख्य शिपाई, दीपक नारायण टिल्लू- मुख्य शिपाई, राजेश तुकारामजी पैदलवार- मुख्य शिपाई, श्रीकृष्ण गंगाराम हिरपूरकर-सहाय्यक कमांडंट, राजू संपत सुर्वे-निरीक्षक,संजीव दत्तात्रेय धुमाळ- निरीक्षक, अनिल उत्तम काळे-सहाय्यक उपनिरीक्षक, मोहन रामचंद्र निखारे- सहाय्यक उपनिरीक्षक, द्वारकादास महादेवराव भांगे-सहाय्यक उपनिरीक्षक, अमितकुमार माताप्रसाद पांडे- उपनिरीक्षक यांचा समावेश आहे.

Topics mentioned in this article