Ratan Tata demise : टाटांची 3800 कोटींची मालमत्ता कोणाला मिळणार? कोण होईल रतन टाटांचा उत्तराधिकारी?

TATA Group : रतन टाटा यांनी लग्न केलं नाही. त्यामुळे त्यांना मूल नव्हतं. अशावेळी टाटांनंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल यावर चर्चा सुरू आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

टाटा समूहाचे (TATA Group) माजी अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata demise) हे भारतातील उद्योगक्षेत्र आणि समाजसेवा या दोन्ही क्षेत्रात आदर्शवत व्यक्तिमत्व होतं. उद्योगपती असतानाही त्यांच्याकडे अत्यंत आदराने पाहिलं जात होतं. टाटा समूहाची धुरा सांभाळणारे रतन टाटा यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. गेल्या दीडशे वर्षांपासून ते टाटाची परंपरा पुढे नेत होते. 3800 कोटींच्या संपत्तीसह रतन टाटा गेल्या अनेक दशकांपासून टाटा समूहाला विकासाच्या दिशेने नेत होते. प्रचंड श्रीमंती असतानाही त्यांची साधारण जीवनशैली पाहून अनेकांचा आश्चर्य वाटायचं. 

रतन टाटा यांनी लग्न केलं नाही. त्यामुळे त्यांना मूल नव्हतं. अशावेळी टाटांनंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल यावर चर्चा सुरू आहे. 3800 कोटींच्या विशाल टाटा समूहाची कमान आता कोण सांभाळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नक्की वाचा - Ratan Tata : अलविदा रतन टाटा! ऋषितुल्य उद्योगपती रतन टाटा यांचं निधन

नोएल टाटा मजबूत स्पर्धक..
संभाव्य उत्तराधिकाऱ्यांपैकी नोएल टाटा हे प्रबळ दावेदार मानले जातात. नवल टाटा यांची दुसरी पत्नी सिमोन यांचे पूत्र नोएव टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. त्यामुळे रतन टाटा यांच्यानंतर टाटा समूहाची जबाबदारी त्यांच्यावर येऊ शकते. नोएल टाटा यांना तीन मुलं आहेत. त्यांना टाटांच्या वारसाचे संभावित उत्तराधिकारी म्हणून पाहिलं जातं. यामध्ये माया टाटा, नेविल टाटा आणि लिया टाटा यांचा समावेश आहे. 

तिन्ही मुलांवर काय आहे जबाबदारी?
34 वर्षीय माया टाटा समूहात चांगली प्रगती करीत आहे. बेयज बिजनेस स्कूल आणि युनिवर्सिटी ऑफ वॉरविकमधून शिक्षण घेतलेल्या मायाने टाटा अपॉर्च्युनिटीज फंड आणि टाटा डिजिटलमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहे. टाटा न्यू अॅप लॉन्च करण्यात त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं. यामध्ये माया यांची रणनीती आणि कुशाग्र बुद्धिमत्ता दिसून येते. 

नक्की वाचा - Ratan Tata : रतन टाटांबद्दलच्या या 10 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

32 वर्षांचे नेविल टाटा कुटुंबाच्या उद्योगात हिरहिरीने सहभाग घेत असल्याचं म्हटलं जातं. त्यांचं लग्न टोयोटा किर्लोस्कर ग्रुपच्या मानसी किर्लोस्कर यांच्याशी झालं आहे. नेविल ट्रेंड लिमिटेडअंतर्गत प्रमुख हायपरमार्केट चेन स्टार बाजाराचे प्रमुख आहेत. 39 वर्षी लिया टाटा या तिघांमध्ये सर्वात मोठ्या आहेत. त्यांनी टाटा समूहाच्या हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये बरेच बदल घडवून आणल्याचं सांगितलं जातं. स्पेनमधील IE Business School मधून शिक्षण घेतलेल्या लिया यांनी ताज हॉटेल्स रिसॉट्स अँड पॅलेसेसमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे.