Mera Ration 2.0 : रेशनकार्डशिवाय मिळणार स्वस्त धान्य, सरकारकडून नियमात मोठा बदल

Ration Card Rules: केंद्र सरकार दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना स्वस्त दरात रेशन पुरवते. आतापर्यंत या लोकांना रेशन मिळवण्यासाठी रेशनकार्ड दाखवावे लागत होते. पण आता फक्त मेरा राशन 2.0 ॲपद्वारेच अन्नधान्य मिळणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Ration Card News: बता दें कि पात्र लोगों को ही सरकार कम दरों या फिर मुफ्त में अनाज मुहैया कराती है.

सरकारकडून शिधापत्रिकाधारकांना कमी दरात किंवा मोफत धान्य आणि वस्तू पुरवल्या जातात. मात्र बदललेल्या नियमांनुसार आता या लोकांना रेशन घेण्यासाठी रेशन कार्ड दाखवण्याची गरज भासणार नाही. डिजिटल पद्धतीन रेशन कार्डशिवाय लोकांना सेवांना लाभ घेता येणार आहे. 

सरकारने रेशन मिळवण्यासाठी ॲप लाँच केले आहे. Mera Ration 2.0 हे ॲप वापरून तुम्ही तुमचं रेशन मिळवू शकता. म्हणजेच आता लोकांना रेशन घेण्यासाठी रेशनकार्ड सोबत बाळगण्याची गरज भासणार नाही. त्यांना फक्त एका ॲपद्वारे अन्नधान्य सहज मिळू शकेल.

केंद्र सरकार दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना स्वस्त दरात रेशन पुरवते. आतापर्यंत या लोकांना रेशन मिळवण्यासाठी रेशनकार्ड दाखवावे लागत होते. पण आता फक्त मेरा राशन 2.0 ॲपद्वारेच अन्नधान्य मिळणार आहे.

भारत सरकारच्या या ॲपचा प्रवासी मजुरांना मोठा फायदा होणार आहे. कारण ते अनेकदा कामाच्या शोधात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत राहतात. या ॲपच्या मदतीने ते कोणत्या शहरात काम करत असले तरी त्यांना त्यांचं रेशन सहज मिळू शकेल. या ॲपमुळे रेशन घेण्यासाठी प्रत्येक वेळी रेशनकार्ड बाळगण्याची गरज दूर होणार आहे.

Advertisement

मेरा राशन अॅप 2.0 कसे वापरावे?

  • सर्वप्रथम तुम्हाला हे ॲप डाउनलोड करावे लागेल. 
  • Google Play Store किंवा Apple Store वरून मेरा राशन 2.0 ॲप डाउनलोड करू शकता.
  • मेरा राशन 2.0 ॲप इन्स्टॉल केल्यानंतर आधार क्रमांक, फोन नंबर यासारखी आवश्यक माहिती भरा.
  • OTP पडताळणीसाठी, तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला OTP भरा.
  • या स्टेप्सनंतर तुमच्या रेशनकार्डची डिजिटल कॉपी ओपन होईल. ही प्रत दाखवून तुम्हाला रेशन सहज मिळू शकेल.