‘गूगल मॅप्स’मुळे काळ थेट पोहोचली नदीत; पुढे जे झालं ते थरकाप उडवणारं होतं

दोन्ही तरुण कर्नाटकातून काही कामानिमित्त केरळला जात निघाले होते. रस्ता माहीत नसल्याने त्यांना गूगल मॅप सुरु केला होता.

Advertisement
Read Time: 2 mins

गूगल मॅपवर विश्वास ठेवून वाहत्या नदीत कार नेणे दोन युवकांच्या चांगलंच अंगलट आलं आहे. त्यांची कार एका झाडाला अडकल्याने दोघांचा जीव कसाबसा वाचला आहे. केरळच्या सुदूर उत्तर कासरगोड जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्य माहितीनुसार, दोन्ही तरुण कर्नाटकातून काही कामानिमित्त केरळला जात निघाले होते. रस्ता माहीत नसल्याने त्यांना गूगल मॅप सुरु केला होता. मात्र गूगल मॅपनुसार जात असताना त्यांचा कार थेट वाहत्या नदीत पोहोचली. सुदैवाने या तरुणांची कार एका झाडाला जाऊन अडकली. 

(नक्की वाचा: मुंबई-गोवा महामार्गाचे काम डिसेंबरअखेर पूर्ण होणार, मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती)

संकटात अडललेले असताना दोघांनीही मदतीसाठी अग्निशमन दलाला फोन केला आणि आपलं लोकेशन त्यांना शेअर केलं. काही वेळातचं अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि रस्सीच्या साहाय्याने दोन्ही तरुणांचा जीव वाचवला. 

(नक्की वाचा- हुंड्यासाठी छळ! 9 महिन्यांच्या बाळाला विष पाजलं, मग आईने उचललं टोकाचे पाऊल)

घटनेत बचावलेला तरुण अब्दुल रशीद यांना सांगितलं की, गूगल मॅप्सवर त्यांना नदीऐवजी रस्ता दाखवण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी कार तशी पुढे नेली. मात्र पुढे पाणी आहे कळण्याआधीच कार पुढे गेली. कार एका पुलावर पोहोचली होती मात्र तिथे दोन्ही बाजूने पाणी भरलं होतं. कार अचानक पाण्याच्या प्रवाहात वाहू लागली आणि एका झाडाला अडकली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवांनांना आमचा जीव वाचवला. 

Advertisement

Topics mentioned in this article