जाहिरात
Story ProgressBack

हुंड्यासाठी छळ! 9 महिन्यांच्या बाळाला विष पाजलं, मग आईने उचललं टोकाचे पाऊल

चंद्रपूरमध्ये एका महिलेने स्वतःसह 9 महिन्यांच्या बाळाच्या आयुष्यातबाबतही टोकाचे पाऊल उचलले आहे.

Read Time: 2 mins
हुंड्यासाठी छळ! 9 महिन्यांच्या बाळाला विष पाजलं, मग आईने उचललं टोकाचे पाऊल

अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर  

नऊ महिन्याच्या बाळाला विष पाजून आईने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये घडली आहे. वरोरा तालुक्यातील शेगावातील ही घटना आहे. पल्लवी मितेश पारोधे (वय 27 वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. दरम्यान नऊ महिन्यांच्या स्मित मितेश पारोधेची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर चंद्रपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच शेगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपासाची चक्र फिरवून आरोपींना ताब्यात घेतले. 

(नक्की वाचा:बाबा आमटेंचं आनंदवन हादरलं, बाथरूममध्ये 25 वर्षीय तरूणीसोबत काय घडलं?)

पती-दिराला अटक

पोलिसांनी पंचनामा करून पल्लवीचा मृतदेह  शवविच्छेदनासाठी वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. दरम्यान सासरची मंडळी पैशांसाठी वारंवार त्रास देत असल्याने मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप पल्लवीच्या वडिलांनी केला आहे. तक्रारीनुसार शेगाव पोलिसांनी हुंडाबळी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पल्लवीच्या पतीसह दिराला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार योगेंद्रसिंह यादव करत आहेत. 

(नक्की वाचा: संतापजनक! नमाज पठणादरम्यान ओळ चुकल्याने पतीने पत्नीसोबत केले भयंकर कृत्य)

"माझ्या मुलीची आत्महत्या नसून हत्याच" 

लग्नानंतर काही महिन्यांतच सासरच्या मंडळींकडून मुलीचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. तिने याबद्दल आम्हाला सांगितले होते, पण आम्ही तिची समजूत काढत होतो. नातू झाल्यानंतर तरी मुलीला चांगली वागणूक देतील,असा विश्वास होता. मात्र दिवसेंदिवस तिला सासरच्या मंडळींकडून पैशासाठी नेहमीच त्रास दिला जात होता. माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून माझ्या नातवाची आणि माझ्या मुलीची तिचा पती व सासरच्यांनी हत्या केली असल्याचा आरोप मुलीचे वडील विनोद श्रीहरी ढोके यांनी केला आहे.

(नक्की वाचा: धक्कादायक! 14 वर्षीय मुलाने भरधाव चालवला टँकर, धडकेत महिलेसह काही मुले जखमी)

Pune | L3 कारवाईनंतर पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर, 3 ड्रग्ज पेडरल आरोपी पोलिसांच्या ताब्यात 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
विधान भवनाचे दरवाजे आता सर्वसामान्यांसाठी बंद, आता दोन दिवसच प्रवेश मिळणार, कारण काय?
हुंड्यासाठी छळ! 9 महिन्यांच्या बाळाला विष पाजलं, मग आईने उचललं टोकाचे पाऊल
Beed shivsena shinde group leader kundlik khande remove from party
Next Article
बीडमधील शिवसेनेच्या बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी, ते प्रकरण भोवलं
;