रेमल चक्रीवादळामुळे अनेक राज्यांना फटका सहन करावा लागत आहे. पश्चिम बंगालमधील अनेक शहरांमध्ये सतत पाऊस सुरू आहे. रेमल चक्रीवादळ धडकलं असून आणखी काही वेळापर्यंत उत्तरेच्या दिशेने आणि त्यानंतर उत्तर-पूर्वेच्या दिशेने सरकत राहिलं. काही वेळाने कमकुवत होईल.
रेमल चक्रीवादळ येण्यापूर्वी पूर्वेकडील विविध राज्यात आपात्कालिन प्रतिबंधक विभागाचे अधिकाऱ्यांकडून सुरक्षा दलांना हाय अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. भारतीय हवामान विभागानुसार, चक्रिवादळ रेमल रविवारी तट पार करेल, परिणामी पश्चिम बंगालच्या सागर द्विपसह बांग्लादेशाच्या खेपुरारामध्ये भुस्खलन होण्याची शक्यता आहे.
सद्यपरिस्थितीत चक्रीवादळ केंद्राभोवती ताशी 110-120 किमी वेगाने वारे वाहत आहेत. वाऱ्याचा वेळ 135 किमी प्रतितासपर्यंत वाढू शकतो. आसाम, मेघालय, त्रिपुरा, मणिपूर आणि मिझोराम सरकारांनी विविध सूचना जारी केल्या आहेत आणि राज्यातील सुरक्षा व्यवस्थांना अलर्टवर राहण्याचा इशारा दिला आहे.
नक्की वाचा - धुळ्यात उन्हाचा तडाखा; दोंडाईचा परिसरात उष्माघातामुळे दोन दिवसात 4 बळी
पश्चिम बंगालला मोठा फटका...
रेमल चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका पश्चिम बंगालला बसत असल्याचं दिसून येत आहे. रेमलमुळे कलकत्त्यासह विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा सामना करावा लागत आहे. विजेचे खांब कोसळले, घराचे छप्पर उडून जाणे... तर काही ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 27 आणि 28 मे रोदी आसामसह पूर्वेकडील इतर राज्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.