Renault And Nisaan New Cars : कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये क्रेटा ही सर्वाधिक पसंत केली जाणारी आणि विकल्या जाणाऱ्या कारपैकी एक आहे. मार्केटमध्ये क्रेटाचा चांगलाच बोलबाला आहे आणि बहुतांश लोक ही कार खरेदी करणं पसंत करतात.पण कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये इतर कंपन्यांच्या अनेक गाड्या आहेत आणि आता या सेगमेंटमध्ये आणखी दोन गाड्या येणार आहेत,ज्यामुळे स्पर्धा आणखी वाढणार आहे.रेनॉल्ट आणि निसान कंपनी त्यांच्या या दोन गाड्या लॉन्च करणार आहेत.तुम्ही जर नवी कॉम्पॅक्ट SUV कार खरेदी करण्याचा विचार करत असाल,तर तुम्हाला या दोन्ही गाड्यांबद्दल माहिती असणे गरजेचे आहे.या गाड्यांची नावे आणि त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
नवीन कार रेनॉल्ट डस्टर, काय आहेत फिचर्स?
रेनॉल्ट आणि निसान कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून मार्केटमध्ये कोणतीही नवी कार आणू शकली नाही,पण पुढच्या वर्षी हे बदलणार आहे.दोन्ही कंपन्या भारतात हुंदई क्रेटाला टक्कर देण्यासाठी आपली नवी कॉम्पॅक्ट SUV लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत आणि त्यांची नावे आहेत रेनॉल्ट डस्टार आणि निसान टेक्टॉन. रेनॉल्ट भारतात 26 जानेवारी 2026 रोजी नवीन कार डस्टर लॉन्च करणार आहे.
नक्की वाचा >> Video: संतापलेल्या विद्यार्थ्यांनी उशिरा येणाऱ्या शिक्षकाला वर्गातच कोंडून ठेवलं, बाहेरून कुलूप लावलं अन्..
ही SUV तिच्या मस्क्युलर आणि बॉक्सी डिझाइनमुळे भारतीय ग्राहकांमध्ये हिट होण्याची शक्यता आहे. यात रेक्टॅंग्युलर हेडलाइट्स असून त्यासोबत Y-शेपचे DRLs (डे टाइम रनिंग लाइट्स) इंटिग्रेटेड आहेत. उंच बोनट, मजबूत रूफ रेल्स आणि ठळक व्हील आर्चेस तिला रग्ड लुक देतात. गाडीची लांबी अंदाजे 4345 मिमी आहे.
कारमधील इंटीरियर आणि फिचर्स
कॅबिनचे डिझाइनही आधुनिक आणि मजबूत असेल. यात 7-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 10.1 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल, जे वायरलेस ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करेल. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यात व्हेंटिलेटेड सीट्स, वायरलेस स्मार्टफोन चार्जर आणि इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक मिळू शकतो.
नक्की वाचा >> 5 वर्षांपासून एकच मोबाईल नंबर वापरताय? कोण-कोण तुमच्यावर पाळत ठेवतंय? पाहा 'हा' व्हायरल व्हिडीओ
टॉप मॉडेलमध्ये अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) मिळण्याची अपेक्षा आहे. लॉन्चच्या वेळी यात 1.0 -लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि 1.3 -लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन येऊ शकते. 1.0 -लीटर पेट्रोल इंजिन-आधारित हायब्रिड सिस्टम 2027 च्या सुरुवातीपर्यंत येऊ शकतो.