5 year Mobile Number logic : जरा विचार करा,एक असा मोबाईल नंबर..जो आपण रोज वापरतो. कॉल उचलतो,OTP घेतो,WhatsApp चालवतो...तो आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल काही सांगू शकतो का? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 31 सेकंदांच्या एका रीलमध्ये असा दावा करण्यात आला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लाखो लोक हा व्हिडिओ पाहून थक्क झाले आहेत.
म्हणूनच हा व्हिडिओ केवळ व्हायरल झालेला नाही,तर लोकांना त्यांच्या मोबाईल नंबरशी संबंधित अनेक गोष्टी तपासणं सुरु केलं आहे. व्हिडिओ कारच्या आतून शूट केला आहे,समोर स्पष्ट रस्ता आणि ट्रॅफिक दिसत आहे.त्यावर लिहिलंय,‘5 वर्षे एकच मोबाईल नंबर…5 तथ्य.'बॅकग्राउंड व्हॉइस म्हणते,‘जर तुम्ही गेल्या 5 वर्षांपासून एकच नंबर वापरत असाल,तर तो तुमच्याबद्दल 5 गोष्टी सांगतो.
हे आहेत 5 पर्सनॅलिटी फॅक्ट्स
- तुमच्यावर कोणताही कोर्ट-कचेरी किंवा पोलीस केस नाही.
- तुम्ही सभ्य आहात आणि आपल्या जोडीदाराबद्दल प्रामाणिक आहात.
- तुमच्यावर कोणतेही कर्ज किंवा बाकी उधारी नाही.
- तुम्ही भांडखोर नाही आणि समाजात तुमची प्रतिमा चांगली आहे.
- तुम्ही जबाबदार आणि विश्वासार्ह व्यक्ती आहात.
5 साल एक ही मोबाइल नंबर
— l ꙰अक्ष 🦋 (@aksh__44) April 20, 2025
5 FACT..!!🚫 pic.twitter.com/eXHbilMTLz
नक्की वाचा >> Viral Video : आरारारारा! चाहत्यांना 'AKON'चं इतकं वेड, लाईव्ह कॉन्सर्टमध्ये सर्वात लोकप्रिय सिंगरची पँटच खेचली
लोकांना या गोष्टी इतक्या रिलेटेबल वाटल्या की त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये स्वतःची मोबाईल हिस्ट्री सांगायला सुरुवात केली.हा व्हिडिओ X वर @aksh_44 या यूजरने 20 एप्रिलला पोस्ट केला होता आणि आतापर्यंत त्याला 1.8 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 37 हजार लाइक्स मिळाले आहेत. एका युजरने म्हटलंय,15 वर्षांपासून तोच नंबर आहे. पप्पांनी 12 वीत असताना दिला होता.
नक्की वाचा >> राजू पाटील-राजेश मोरेंचा हळदी समारंभात भन्नाट डान्स! मनसे, शिवसेनेचे आजी-माजी आमदार एकत्र नाचले, Video व्हायरल
दुसऱ्या यूजरने कमेंटमध्ये म्हटलंय, ‘माझ्याकडे 21 वर्षांपासून तोच नंबर आहे,कधी बदललाच नाही.कुणी 10 वर्षे म्हटले, कुणी 5-15 वर्षे..म्हणजे लोकांच्या मोबाईल नंबर स्टोरीजही एखाद्या नॉस्टॅल्जिक डायरीसारख्या आहेत.तुम्हालाही वाटतं का की एक नंबर माणसाच्या सवयी,स्थिरता आणि जबाबदारी दाखवू शकतो? की हा फक्त सोशल मीडियाचा मजेदार लॉजिक आहे?तुम्ही किती वर्षांपासून एकच मोबाईल नंबर वापरत आहात?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world