Rinku Singh Engagement: सिक्सर किंग रिंकू सिंहचा साखरपूडा, जेवणाचा 'हा' होता खास मेन्यू, 'यांनी' लावली हजेरी

रिंकू आणि प्रिया या नवदाम्पत्याचे लग्न 18 नोव्हेंबर रोजी निश्चित झाले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
लखनौ:

क्रिकेटर रिंकू सिंह आणि सपा खासदार प्रिया सरोज यांचe लखनऊमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये साखरपुडा झाला. यावेळी रिंकूने प्रिया यांना साखरपुड्याची अंगठी त्यांच्या बोटात घातली. यावेळी जवळपास 300 पेक्षा जास्त विशेष पाहुणे उपस्थित होते. सारखपूडा झाल्यानंतर लग्न कधी असा ही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे रिंकू आणि प्रिया यांचे लग्न  18 नोव्हेंबर रोजी निश्चित झाले आहे. हे लग्न धुमधडाक्यात होईल असं बोललं जात आहे. त्याची झलक साखपूड्यात दिसून आली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या हाय-प्रोफाइल कार्यक्रमात रिंकू आणि प्रिया यांच्या कुटुंबीयांव्यतिरिक्त, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, डिंपल यादव, जया बच्चन, इकरा हसन, रामगोपाल यादव यांसारखे अनेक मोठे नेते उपस्थित होते. यावेळी रिंकूने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती. तर प्रिया यांनी गुलाबी रंगाच्या लेहेंगा घातला होता. त्यात त्या खूप सुंदर दिसत होत्या. या जोडप्याने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले होते. दोघेही एकमेकांचा हात धरून स्टेजवर जाताना दिसले.

ट्रेंडिंग बातमी - Nilesh Rane: 'नितेशने जपून बोलावं, सगळ्या गोष्टींचे भान ठेवून...' निलेश राणेंचा भावाला सल्ला

रिंकू सिंहने प्रिया सरोजला अंगठी घातल्याबरोबर ती भावूक झाली. हा क्षण कोणत्याही मुलीच्या आयुष्यातील खूप खास असतो. या वेळी प्रियाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. अंगठी बदलल्यानंतर दोघेही खूप आनंदी दिसत होते. अंगठी घातल्यानंतर  संपूर्ण हॉल टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेला. सर्वांनी नव्या जोडप्याला शुभेच्छा दिल्या. त्या दोघांनीही सर्वांच्या शुभेच्छांचा स्विकार केला. त्यावेळी संपूर्ण हॉलमध्ये आनंदाचे वातावरण होते. 

ट्रेंडिंग बातमी - Jalindar Supekar: हगवणे कुटुंबाला मदत ते 500 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप .. अखेर जालिंदर सुपेकर बोलले!

वाराणसीच्या रहिवासी असलेल्या प्रिया सरोज या मछलीशहर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. त्यांचे वडील, तुफानी सरोज, सध्या समाजवादी पक्षाचे आमदार आहेत. ते यापूर्वी तीन वेळा लोकसभा खासदारही राहिले आहेत. रिंकू आणि प्रिया या नवदाम्पत्याचे लग्न 18 नोव्हेंबर रोजी निश्चित झाले आहे. या दिवशी मोठ्या जल्लोषात हा विवाह सोहळा होईल. याला क्रिकेट जगतातले तारे ही येतील असं बोललं जात आहे. पण हा साखरपूडा खास होता हे मात्र निश्चित 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Shivsena News: महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचं अखेर ठरलं ! 'या' अटीवर शिंदेंच्या सेनेत करणार प्रवेश?

साखरपुड्याचे खास मेन्यू

प्रिया सरोज आणि रिंकू सिंह यांच्या साखरपुड्यासाठी खास शाकाहारी मेन्यू तयार करण्यात आला होता. ज्यात विविध पदार्थांचा समावेश होता. हा मेन्यू काय होता त्यावर एक नजर टाकूयात 

  • बंगाली मिठाई: रसगुल्ला, काजू पनीर रोल.
  • रिंकूचे आवडते पदार्थ: पनीर टिक्का आणि मटर मलाई.
  • मुख्य मेन्यू: खास अवधी खाना (लखनवी पदार्थांचा समावेश).
  • वेलकम ड्रिंक: लाइव्ह काउंटरमधून खास 'कुहाडा' 
  • स्टार्टर्स: युरोपियन, चायनीज, एशियन आणि इंडियन पदार्थ.
  • मेन कोर्स: मलाई कोफ्ता, कढई पनीर, मिक्स व्हेज, मंचुरियन, स्प्रिंग रोल आणि नूडल्स.