RSS बॅकग्राऊंड, 5 वेळा खासदार, शेयर्समध्ये तगडी गुंतवणूक; नव्या शिक्षण मंत्र्यांचं शिक्षण किती माहिती आहे?

अतिरिक्त जबाबदारी स्वीकारलेल्या नव्या शिक्षणमंत्र्यांचं शिक्षण किती झालं आहे?

जाहिरात
Read Time: 3 mins

Who is Pralhad Joshi? : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर भाजपचे वरिष्ठ नेता प्रल्हाद जोशी यांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. धर्मेश प्रधान यांनी शनिवारी नीट परीक्षेच्या पेपरफुटी विवादाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला. 

प्रल्हाद जोशी यांचं शिक्षण किती?

२७ नोव्हेंबर १९६२ मध्ये कर्नाटकच्या बीजापूरमध्ये जन्माला आलेले प्रल्हाद जोशी यांनी हुबळीत प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यांनी प्राथमिक शिक्षण रेल्वे शाळेतून पूर्ण केलं आणि त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी न्यू इंग्लीश शाळेत प्रवेश घेतला. उच्च शिक्षणासाठी जोशी यांनी हुबळी येथील श्री कदाससिद्धेश्वर आर्ट्स कॉलजमध्ये पदवीचं शिक्षण घेतलं. राजकारणात येण्यापूर्वी ते व्यवसाय करीत होते. त्यानंतर ते कर्नाटकात भाजपचे एक प्रमुख नेता म्हणून पुढे आले. 

Advertisement

प्रल्हाद जोशी ग्रॅज्युएट (BA) असल्याची माहिती आहे. तरुण असताना ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले. १९९० च्या दशकात हुबळीत ईदगाह मैदानात तिरंगा फडकावण्याचं आंदोलन आणि विविध जन अभियानाता ते सक्रिय होते. संघानंतर ते कर्नाटक भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्ये सामील झाले. 
 

राजकीय करियर...
 
प्रल्हाद जोशी हे कर्नाटकच्या धारवाड  मतदारसंघात पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले. २००४ सालापासून जोशी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करीत आहेत. या वर्षांमध्ये त्यांनी पक्ष आणि केंद्र सरकार दोन्ही ठिकाणी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं. 

नक्की वाचा - धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मंजूर, आता शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी कुणाकडे?

२०१९ ते २०२४ पर्यंत त्यांनी संसदीय कार्य, कोळसा आणि खाण मंत्रालयाच्या केंद्रीय मंत्री म्हणून काम केलं. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाची जबाबदारी घेतली. नवीकरणीय ऊर्जा मंत्री म्हणून त्यांनी राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन, पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, पीएम कुसूम आणि भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षमतेचा विस्तारावर लक्ष दिलं. 

प्रल्हाद जोशी यांच्यासमोर अनेक आव्हानं...

संघटना आणि संसदेत दोन्ही ठिकाणी सक्रिय असल्या कारणाने प्रल्हाद जोशी पक्षातील एक विश्वासार्ह चेहरा मानला जात आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अतिरिक्त जबाबदारी मिळाल्यानंतर आता त्यांची जबाबदारी वाढली आहे. राष्ट्रीय शिक्षण नीती प्रभावीपणे लागू करणं, उच्च शिक्षण व्यवस्था अधिक चांगली करणे, परीक्षेत पारदर्शकता वाढवणे आणि डिजिटल शिक्षा मजबूत करावं लागेल. सरकारने प्रल्हाद जोशी यांचा मोठा राजकीय अनुभव आणि संघटनेत काम करण्याची क्षमता पाहता त्यांना ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. 

Advertisement

शिक्षण मंत्र्यांचा पगार किती?

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना दरमहा 100,000 रुपये मूळ वेतन (Basic Salary) दिले जाते. याशिवाय त्यांना विविध सरकारी भत्ते देखील मिळतात. त्यात मतदारसंघ भत्ता मिळतो. हा भत्ता दरमहा 70,000 रुपये असतो. या शिवाय ​कार्यालयीन भत्ता ही दिला जातो. तो दरमहा 60,000 रुपये असतो.  तर ​दैनिक भत्ता संसदेचे अधिवेशन किंवा समितीच्या बैठका चालू असताना दिला जातो. हा दररोज 2,000 रुपये प्रमाणे असतो. ​सरकारी निवासस्थान आणि सुरक्षा व्यवस्था ही पुरवली जाते. ​केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून प्रल्हाद जोशी यांना नवी दिल्लीतील लुटियन्स झोनमध्ये आलिशान सरकारी बंगला दिला जातो.

प्रल्हाद जोशी यांची संपत्ती किती?

प्रल्हाद जोशी यांच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या नावावर ५ कोटींचं आलीशान घर आहे. याशिवाय त्यांची चांगली गुंतवणूकही आहे. याबद्दलचा खुलासा त्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्या निवडणूक आयोगाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रात करण्यात आले. यानुसार, प्रल्हाद जोशी यांची नेटवर्थ २१.०९ कोटींहून अधिक आहे. त्यांची ८.९७ कोटींचा चल संपत्ती आहे. त्यांच्यावर ८ कोटींहून जास्त कर्जदेखील आहे. विशेष म्हणजे त्यांनी शेयर आणि म्युचुअल फंडात तब्बल १.६२ कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक केली होती. 

Advertisement