Mohan Bhagwat : संघ आणि सरकार यांच्यातील 'मतभेद' आणि 'मनभेद' वर मोहन भागवत यांचे स्पष्ट उत्तर

RSS Chief Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी सरकार आणि संघाचं नातं नेमकं काय आहे? यावर उत्तर दिलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवत यांनी महत्त्वाच्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे.
मुंबई:

RSS Chief Mohan Bhagwat :  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या 100 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. दिल्ली येथे 3 दिवस चाललेल्या या कार्यक्रमात त्यांनी आत्मनिर्भरता आणि हिंदू राष्ट्र यांसारख्या विषयांवर त्यांचे विचार मांडले. तिसऱ्या दिवशी ते प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांची उत्तरं दिली

'आम्ही सल्ला देऊ शकतो, सरकार निर्णय घेते'

एनडीटीव्हीने मोहन भागवत यांना प्रश्न विचारला की, सरकार आणि संघ यांच्यात चांगले संबंध का नाहीत, देशाला आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार आणि संघ यांच्यातील मतभेद आणि समान विचार काय आहेत? सरकारचा अजेंडा संघ ठरवतो का?

या प्रश्नाला उत्तर देताना मोहन भागवत म्हणाले की, "संघाचे प्रत्येक सरकारसोबत चांगले संबंध आहेत, राज्यांच्या सरकारसोबतही चांगले संबंध आहेत. काही सरकारांमध्ये अंतर्गत मतभेद आहेत. ही व्यवस्था ब्रिटिशांनी तयार केली आहे, त्यामुळे आमचे काही मतभेद आहेत. परंतु, आम्हाला काय हवे आहे, हे सरकार प्रमुखांनी समजून घेतले पाहिजे. ते कसे करायचे, हे त्यांना समजले पाहिजे."

( नक्की वाचा : RSS ला हव्या असलेल्या हिंदू राष्ट्राचा अर्थ काय? सरसंघचालक मोहन भागवतांनी स्पष्ट शब्दात सांगितलं )

Advertisement

'संघर्ष आहे, वाद नाही'

मोहन भागवत पुढे म्हणाले की, "आमचे स्वयंसेवक काही काम करतात आणि त्याचे चांगले परिणाम येतात, तर ते लागू करण्यावर विचार केला पाहिजे. संघर्ष आहे, वाद नाही. ही समज असेल तर कोणताही वाद होणार नाही. आमच्या संघात ही समज आहे. आम्ही सामूहिक निर्णय घेतो. मतभेदाचे मुद्दे आहेत, पण मनभेद नाहीत. जे प्रयत्न करत आहेत, ते जरी वेगवेगळ्या मार्गांनी जात असले तरी, त्यांचे अंतिम लक्ष्य एकच आहे."

'आम्ही फक्त सल्ला देतो'

सरसंघचालकांनी सांगितलं, "सगळे काही संघ ठरवतो, ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे. असे होणे शक्यच नाही. आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो, पण निर्णय त्या क्षेत्रातील लोकांचा आहे. आमच्या बाबतीत निर्णय आमचा असतो. जर आम्हीच सर्व निर्णय घेतले असते, तर एवढा वेळ लागला नसता."
 

Advertisement
Topics mentioned in this article