
RSS Chief Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) च्या 100 वर्षांच्या पूर्तीनिमित्त (शताब्दी वर्ष) राजधानी दिल्लीमध्ये विशेष व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. यामधील पहिल्या व्याख्यानात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले की, संघाची सार्थकता भारताच्या विश्वगुरू बनण्यात आहे. भारताला जगाला योगदान द्यायचे आहे आणि आता ती वेळ आली आहे. यावेळी त्यांनी रा.स्व. संघाला अभिप्रेत असलेल्या हिंदू राष्ट्राचा अर्थही सांगितला.
सरसंघचालकांनी या व्याख्यानात सांगितलं की, भारत दोन मोठ्या गुलामींना तोंड देऊन स्वतंत्र झाला आहे. 1857 नंतर, भारतीयांचा असंतोष योग्य प्रकारे व्यक्त व्हावा आणि त्यामुळे नुकसान होऊ नये, यासाठी काही व्यवस्था केली जात होती, परंतु काही लोकांनी तिचा ताबा घेतला आणि तिला स्वातंत्र्यलढ्याचे शस्त्र बनवले.
ते म्हणाले की, ‘इंडियन नॅशनल काँग्रेस' या नावाने ती धारा सुरू झाली. त्यातूनच अनेक राजकीय प्रवाह बाहेर पडले. इतके सारे राजकीय पक्ष निघाले. त्या राजकीय आंदोलनाने देशाला चरखा चालवायला आणि जगणे-मरणे शिकवले. स्वातंत्र्यानंतर त्या प्रवाहाला जसे असायला हवे होते, तसे झाले असते तर आजचे चित्र वेगळे असते. पण तसे झाले नाही. दोष देण्यासारखे नाही, हे एक सत्य आहे.
RSS शताब्दी समारोह:
— NDTV India (@ndtvindia) August 26, 2025
'संघ की सार्थकता भारत के विश्वगुरु बनने में है': संघ प्रमुख डॉ मोहन भागवत#RSS100 pic.twitter.com/jUhsUJ0WiG
देशात एक तिसरी धारा होती, ज्यांनी समाजाला त्यांच्या मूळ मूल्यांवर चालण्याचे आवाहन केले. स्वामी दयानंद सरस्वती आणि स्वामी विवेकानंद ही त्या धारेतील प्रमुख नावे होती. संघ संपूर्ण भारतात सर्वांना संघटित करण्याचे काम करत आहे. संघाचे काही कट्टर विरोधक होते, तेही आज समर्थक बनले आहेत.'
( नक्की वाचा : RSS News: सरसंघचालक मोहन भागवतांना भेटले अनेक मुस्लीम मौलवी, कोणत्या मुद्यावर झाली सहमती? )
सरसंघचालकांनी यावेळी पुढं सांगितलं की, आपण हिंदू राष्ट्र म्हणतो, तेव्हा याचा अर्थ असा नाही की आपण कोणाला तरी वगळत आहोत. हिंदू राष्ट्राचा अर्थ कोणाचाही विरोध नाही. संघ कोणाच्याही विरोधात निघालेला नाही. गेल्या 100 वर्षांपासून संघ संपूर्ण समाजाला संघटित करण्याचे काम करत आहे. हिंदू राष्ट्रात सर्वांसाठी न्याय समान राहिला आहे.
भागवत म्हणाले की, विविधतेतही एकता आहे. समजा, एखादी परीक्षा आहे आणि त्यात 4 प्रश्न आहेत. 2 कठीण आणि 2 सोपे आहेत, तर आधी कोणता निवडाल? आधी सोपा प्रश्न निवडायला हवा. जे स्वतःला हिंदू म्हणतात, त्यांचे जीवन चांगले बनवा, तर मग काही कारणास्तव जे स्वतःला हिंदू असूनही तसे म्हणत नाहीत, ते देखील म्हणू लागतील. हे आता सुरू झाले आहे. जे विसरले आहेत, त्यांनाही आठवेल. तेही होईल. संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन आवश्यक आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world