Saif Ali Khan : सैफकडे आलेली 15 हजार कोटींची संपत्ती नेमकी कुणाची? शत्रू संपत्ती संकल्पना नेमकी काय आहे?

जाहिरात
Read Time: 2 mins

अभिनेता सैफ अली खान हल्ल्यातून सावरत असतानाच त्याला आणखी एक झटका बसण्याची (Saif Ali Khan Property in Bhopal) शक्यता आहे. भोपाळमधली त्याची 15 हजार कोटींची संपत्ती केंद्र सरकार कुठल्याही क्षणी ताब्यात घेऊ शकते. ही सर्व संपत्ती शत्रू संपत्ती म्हणून घोषित करण्यात आली आहे. त्याविरोधात सैफनं उच्च न्यायालयात दाद मागितली होती, त्यानंतर आदेशावर स्टे आला होता. तो स्टे आता कोर्टानं हटवला आहे. त्यामुळे सैफची 15 हजार कोटीची संपत्ती सरकारी जमा होऊ शकते. भोपाळमधील 15 हजार कोटीची (Saif Ali Khan wealth of 15 thousand crores) संपत्ती ही सैफची मावस आजी आबिदा सुल्तान यांची आहे. पण त्या फाळणीनंतर पाकिस्तानला गेल्या. त्यानंतर हीच संपत्ती सैफच्या सख्ख्या आजीकडे आली. पण सरकार दरबारी ही संपत्ती शत्रू संपत्ती म्हणून नोंदवली गेलीय.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

सैफच्या 15 हजार कोटीच्या संपत्तीवर टाच?
सैफ अली खान हा भोपाळच्या नवाब घराण्याचा वारसदार आहे. 1947 पर्यंत भोपाळ हे एक राजेशाही संस्थान होतं. नवाब हमीदुल्लाह हे भोपाळ संस्थानचे शेवटचे नवाब होते. सैफचे वडील मंसूर अली खान पटौदी हे हमीदुल्लाहचे नातू होते. हमीदुल्लाहल्या तीन मुली होत्या, त्यातल्या आबिदा सुल्तान महत्त्वाच्या. आबिदा सुल्तान यांच्या नावावर भोपाळमधली 15 हजार कोटीची संपत्ती होती. पण आबिदा 1950 मध्ये पाकिस्तानला गेल्या, तिथंच स्थाईक झाल्या. आबिदानंतर त्यांची बहिण साजिदा सुल्तान यांच्याकडे भोपाळची संपत्ती गेली. साजिदा सुल्तान यांनी नवाब इप्तिखार अली खान पटौदीसोबत लग्न केलं. साजिदा सुल्तान या सैफच्या सख्खी आजी आहेत. आबिदा ह्या पाकिस्तानमध्ये गेल्यानं त्यांची संपत्ती शत्रू संपत्ती म्हणून घोषीत करण्यात आली. त्यामुळे मूळ संपत्तीच्या मालकिण आबिदा आहेत, त्यामुळे सैफकडे असलेली संपत्ती धोक्यात आली आहे. 

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Saif Ali Khan : हल्लेखोरापेक्षा पिळदार शरीरयष्टी, तरीही अभिनेता स्वत:चा बचाव का करू शकला नाही? अखेर कारण समोर

शत्रू संपत्ती काय आहे?
शत्रू संपत्ती म्हणचे भारताचा शत्रू देश पाकिस्तानातील नागरिकांची संपत्ती. दोन देशांमध्ये युद्ध झाल्यानंतर स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या संपत्तीला शत्रू संपत्ती म्हटलं जातं. शत्रू देशात राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या संपत्तीचा देशविरोधी कारवायांसाठी उपयोग करू नये यासाठी ती संपत्ती सरकारकडे येते. 1968 अधिनियमांतर्गत शत्रू संपत्तीवर भारत सरकारचा अधिकार असतो. शत्रू संपत्ती विकून सरकार कमाई करते. 

Advertisement

शत्रू संपत्ती अधिनियम 1968 साली बनवण्यात आले. त्यानुसार पाकिस्तानात जाणाऱ्या लोकांनी भारतामध्ये सोडलेली संपत्ती सरकारच्या ताब्यात जाते. या कायद्यानुसार या संपत्तीवर अन्य कुणी दावा करु शकत नाही. भोपाळमध्ये कोहेफिजा ते चिकलोद पर्यंत पतौडी परिवाराची जवळपास 100 एकर संपत्ती आहे. या जमिनीवर जवळपास दीड लाख लोकं राहात आहेत.