Student Video Viral : नीट पेपर लीकवरून गल्लीपासून दिल्लीपर्यंत विद्यार्थ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे.याचे पडसाद अनेक राज्यांमध्ये उमटताना दिसत आहेत. अशातच काही ग्रामीण भागातही विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांनी तोंड वर केलं आहे. विकासकामांचा पाढा वाचणाऱ्या लोकप्रतिनिधींची झोप उडवणारा आणखीन एक व्हिडीओ समोर आला आहे. छत्तीसगडमधील सुरजपूर जिल्ह्यात विद्यार्थ्यांना पूराच्या पाण्यातून प्रवास करावा लागतो, मन हेलावून टाकणारा हा व्हिडीओ समोर आला आहे.
शाळेचा मार्ग बंद झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम
भैयथान ब्लॉकमधील करीमाती गावात मोरी नसल्याने पावसाळ्यात नाला दुथडी भरून वाहतो. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून नाला पार करावा लागतो. अशा परिस्थितीत गावातील एका शेतकऱ्याने पुढाकार घेत मुलांना त्यांच्या खांद्यावर बसवून नाला पार करण्यास मदत केली. सुरजपूर जिल्ह्यातील भैयथान ब्लॉकच्या करीमाती ग्रामपंचायतीअंतर्गत परसिया वस्तीजवळील मार्घेटिया नाल्यावर आजही मोरी नसल्यामुळे गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.पावसाळ्यात नाला तुडुंब भरून वाहत असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांचा शाळेचा मार्ग बंद होतो आणि त्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो.
नक्की वाचा >> Farmer News: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ही आहे शेवटची तारीख
विद्यार्थ्यांचा पूराच्या पाण्यात प्रवास करतानाचा थरारक व्हिडीओ
या परिस्थितीवर मात करत गावातील एका शेतकऱ्याने पुढाकार घेत दररोज विद्यार्थ्यांना त्यांच्या खांद्यावर उचलून नाला पार करून शाळेत पोहोचवण्याचे काम सुरू ठेवले आहे.त्याच्या या माणुसकीच्या कृतीचे सर्वत्र कौतुक होत असले तरी, दुसरीकडे मूलभूत सुविधांच्या अभावामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.गावकऱ्यांनी या ठिकाणी तातडीने मोरी किंवा पूल बांधण्याची मागणी केली असून,विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world