School Syllabus : मोठा निर्णय! आता शाळांमध्ये आयुर्वेदाचं शिक्षण; विज्ञानाचा अभ्यासक्रम बदलणार

शालेय विद्यार्थ्यांना आरोग्य, पोषण आणि पर्यावरण संतुलनाचं महत्त्व भारतीय दृष्टिकोनातून समजावं हा यामागील महत्त्वाचा हेतू आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

NCERT Science School Syllabus : राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० च्या अंतर्गत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात मोठा बदल होणार आहे. NCERT सहावी ते आठवीच्या विज्ञानाच्या अभ्यासक्रमात आयुर्वेदाशी संबंधित प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे.  शालेय विद्यार्थ्यांना आरोग्य, पोषण आणि पर्यावरण संतुलनाचं महत्त्व भारतीय दृष्टिकोनातून समजावं हा यामागील महत्त्वाचा हेतू आहे, असं सांगितलं जात आहे. 

NCERT चे संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांच्या मते, या उपक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना केवळ वैज्ञानिक ज्ञानाचीच नव्हे तर शारीरिक आणि मानसिक कल्याणाच्या तत्त्वांची देखील ओळख करून देणे आहे.

याअंतर्गत 6 वी ते 8 वीच्या विज्ञानाच्या पुस्तकांमध्ये आयुर्वेदावर आधारित प्रकरणे समाविष्ट करण्यात आली आहेत. NCERT सहावीच्या पाठ्यपुस्तकात मूलभूत सिद्धांतात आयुर्वेदासाठी २० गुण असतील. तर आठवीच्या पुस्तकात दिनचर्या आणि ऋतुचर्यासारख्या विषयांवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. हा बदल केवळ पुस्तकांपुरता सीमित नसून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक वारशाच्या दिशेने प्रेरित करण्याची सुरुवात आहे. 

नक्की वाचा - NEET Student death : 40 मिनिटं Video कॉलवर बोलला, NEET च्या विद्यार्थ्याच्या मृत्यूने वडिलांना धक्का!

‘Curiosity' या नव्या पुस्तकात विशेष अध्याय सामील करण्यात येणार आहे. इयत्ता 8 वीच्या विज्ञान पुस्तकात शरीर-मन-पर्यावरणातील संतुलनावर चर्चा असलेला नवीन अध्याय जोडला जाणार आहे. इयत्ता 6 वीमध्ये विज्ञान शिक्षणाअंतर्गत पदार्थांचे वर्गीकरण आता आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून शिकवले जाणार आहे.

Advertisement

UGC करणार विस्तार
लवकरच महाविद्यालयांमध्येही आयुर्वेद-केंद्रित अभ्यासक्रम सुरू होणार. यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नवीन विषय प्रभावीपणे शिकवण्यासाठी वर्कशॉप आणि ओरिएंटेशन प्रोग्राम आयोजित केले जाणार आहेत. यानिमित्ताने भारतीय प्राचीन चिकित्सा पद्धतीला नवे व्यासपीठ मिळणार आहे.