Scooty challan 20 lakh: हेल्मेट नाही घातलं, 20 लाखाचं चालान फाडलं, पुढे काय घडलं?

नागरिकांनी 'स्कूटी चालवण्यासाठी आता करोडपती (Millionaire) असणे आवश्यक आहे का?' असे प्रश्न विचारले.

जाहिरात
Read Time: 2 mins

वाहतुकीचे नियम सर्वांसाठीच सारखे असतात.ते सर्वांना पाळावे ही अपेक्षा असते. पण तसं होताना दिसत नाही. त्यासाठी कठोर नियम आणले गेले आहेत. त्याचा उद्देश ऐवढाच आहे की प्रत्येकाने नियमाचे पालन करावे. वाहतुकीचे नियम तोडल्यानेच अनेक अपघात होतात हे ही समोर आलं आहे. तर हेल्मेट न घालणे अनेक वेळा जीवावर बेततं. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर कडक नियम अमलात आणले जात आहे. पण या कडक नियमाचा अनावश्यक फटका ही वाहन चालकांना बसत आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये समोर आली आहे.  

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे एका स्कूटीस्वाराला वाहतूक नियमांचे उल्लंघन (Violation of Traffic Rules) केल्याबद्दल ₹ 20 लाख 74 हजार रुपयांचे चालान (Challan) मिळाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे प्रकरण केवळ फिल्मी वाटावे असे नाही, तर यामुळे थेट पोलीस प्रशासनात (Police Administration) मोठी खळबळ उडाली आहे. स्कूटीसारख्या साध्या वाहनावर एवढ्या मोठ्या रकमेचे चालान आल्याने सोशल मीडियावर (Social Media) हा प्रकार तात्काळ व्हायरल झाला.

नक्की वाचा - जगातील सर्वात महागडा तांदूळ, किंमत 12 हजार 500 रूपये प्रति किलो, कुठे मिळतो माहित आहे का?

'207' कलम ठरले लाखोंच्या दंडाचे कारण
हा प्रकार 4 नोव्हेंबर रोजी नवी मंडी कोतवाली क्षेत्रातील गांधी कॉलनी चौकीवर घडला. संबंधित व्यक्तीने हेल्मेट घातले नव्हते. ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) नव्हते. गाडीची कागदपत्रेही (Vehicle Documents) नव्हती. जेव्हा चालानची प्रत पाहिली गेली. तेव्हा दंडाची रक्कम तब्बल ₹ 20,74,000 होती. ही रक्कम पाहून दुचाकी चालकाचे होश उडाले. वस्तुतः, उपनिरीक्षक (Sub Inspector) यांच्याकडून मोटर वाहन कायदा कलम 207 (MV Act Section 207) भरताना तांत्रिक चूक झाली. संगणक प्रणालीने (Auto System) चुकीने या कलमाची संख्या दंडाच्या रकमेत जोडली. ज्यामुळे चालानची रक्कम लाखोंच्या घरात पोहोचली.

नक्की वाचा - Beed News: 'तो' आरोपी, धनंजय मुंडे अन् पैशांची मागणी, जरांगेच्या मर्डर प्लॅनची आणखी एक बाजू, नवा ट्वीस्ट?

प्रकरण वाढताच पोलिसांकडून स्पष्टीकरण
सोशल मीडियावर हा चालान व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी 'स्कूटी चालवण्यासाठी आता करोडपती (Millionaire) असणे आवश्यक आहे का?' असे प्रश्न विचारले. प्रकरण गंभीर बनल्यावर वाहतूक विभागाने (Traffic Department) तातडीने तपास सुरू केला. ही चूक मानवी (Typing Error) होती, जाणूनबुजून केलेली नाही, असे स्पष्ट करण्यात आले. यानंतर, चालानची रक्कम कमी करून ₹ 4,000 रुपये करण्यात आली, ज्यामुळे वाहनमालकाला मोठा दिलासा मिळाला. संबंधित अधिकाऱ्याकडून या चुकीबद्दल स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.

Advertisement