काँग्रेसनेते शशी थरूर हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असतात. लोकसभेत महिला खासदारांबरोबर घेतलेल्या सेल्फीने एका वादंग निर्माण झाला होता. शिवाय तो सेल्फी मोठ्या प्रमाणात व्हायरल ही झाला. त्यावरून थरूर यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका ही झाली. याच बरोबर क्रिकेट मॅच पाहाताना त्यांच्या सोबत अनेक महिला मुली सेल्फी घेत असतात. त्यांचे ही फोटो या आधी व्हायरल झालेले आपण पाहीले आहेत. त्यांचा वेगळा असा चाहता वर्ग आहे. त्यात आता त्यांची दोन अभिनेत्रीं सोबतचे फोटोही समोर आले आहे. ते चांगलेच व्हायरल ही झाले आहे. त्यावर नेटकऱ्यांनीही आपल्या प्रतिक्रीया नोंदवल्या आहेत.
विशेष म्हणजे हे फोटो स्वत: शशी थरूर यांनीच आपल्या एक्स अकाऊंट वरून पोस्ट केले आहेत. जवळपास लाखो लोकांनी ते फोटो पाहीले आहेत. तर हजारोंनी त्याला लाईक केले आहे. तर शेकडो कमेंट या फोटोवर आल्या आहेत. हे फोटो दुसरे तिसरे कोणी नाही तर केरळच्या प्रसिद्ध अभिनेत्रीं सोबतचे आहे. चेन्नईला जाणाऱ्या विमानात या दोन्ही अभिनेत्री शशी थरूर यांना भेटल्या. थरूरही याच विमानाने प्रवास करत होते. त्यांची सीट ही त्या दोन अभिनेत्रींच्या बाजूला होती. त्यामुळे आपोआप सेल्फी हा आला. सेल्फी घेतलेले हे फोटो थरूर यांनी ट्वीट केले आहेत.
ट्वीटमध्ये ते म्हणतात चेन्नईला जाणाऱ्या विमानात मला मल्याळम चित्रपटसृष्टीतील दोन युवा स्टार भेटले. अनुपमा (Anupama Parameswaran) आणि राजिशा विजयन (Rajisha Vijayan) यांच्यासोबत प्रवास करता आला. त्यांच्या सोबत प्रवास करताना खूप छान वाटलं. त्यांच्या आगामी ‘बायसन (Bison)' चित्रपटाला मी यशासाठी शुभेच्छा देतो! असं थरूर या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. त्यानंतर त्यांनी हे फोटो पोस्ट केले आहेत. अनुपमा आणि राजिशा या युवा अभिनेत्रींचा मल्याळम चित्रपट सृष्टीत चांगलाच दबदबा आहे.
शशी थरूर हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक ही लढवली होती. ते केरळमधून लोकसभेवर निवडून आले आहेत. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांची इंग्रजी भाषेवरील कमांड भल्याभल्यांना आवाक करते. ते नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. महिला वर्गात ते खास करून खूप लोकप्रिय आहेत. लोकसभेत ते पक्षाची बाजू चांगल्या पद्धतीने मांडत असतात. लोकसभेतील महिला खासदारांसोबत त्यांनी घेतलेल्या सेल्फीची चर्चा ही देशभर रंगली होती.