13 minutes ago

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळातील अत्यंत लोकप्रिय उपक्रमांपैकी एक असलेली शिवभोजन थाळी योजना बंद करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेचा आढावा घेण्यात येणार आहे. दिल्ली विधानसभेचं मतदान 5 फेब्रुवारी रोजी पार पडलं. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल 8 फेब्रुवारी रोजी समोर येईल. 

Feb 06, 2025 13:00 (IST)

Live Update : राजीनामा द्या नाहीतर इतर घोटाळे बाहेर काढेन; अंजली दमानियांचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

राजीनामा द्या नाहीतर इतर घोटाळे बाहेर काढेन; अंजली दमानियांचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

Feb 06, 2025 12:35 (IST)

Live Update : धनंजय मुंडेंकडून करुणा शर्माला दरमहिना 2 लाखांची पोटगी मिळणार - कौटुंबिक न्यायालयाचा निर्वाळा

करुणा मुंडे ही धनंजय मुंडे यांची पत्नीच - कौटुंबिक न्यायालयाचा निर्वाळा 

धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांच्यावर घरगुती हिंसाचार केल्याचा देखील न्यायालयाने दिलेल्या ऑर्डरमध्ये उल्लेख

करुणा मुंडे यांना महिन्याला 2 लाख पोटागी द्या, कोर्टाचा आदेश

Feb 06, 2025 11:31 (IST)

Live Update : राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर सलग तिसऱ्या दिवशी पोलिसांचा मोठा बंदोबस्त

राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर सलग तिसऱ्या दिवशी पोलिसांचा मोठा बंदोबस्त 

कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुणे पोलिसांकडून राहुल सोलापूरकर यांच्या निवासस्थानाबाहेर आजही पोलीस बंदोबस्त 

सोलापूरकर यांच्याविरोधात शिवप्रेमी आक्रमक 

सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करत सोलापूरकरांनी माफी मागावी शिवप्रेमींची मागणी 

तर काल रात्री पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली सोलापूरकर यांच्या परिवाराची भेट 

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आज दिवसभर पुणे पोलिसांचा बंदोबस्त सोलापूरकर यांच्या निवासस्थाना बाहेर असणार

Feb 06, 2025 11:17 (IST)

Live Update : पुण्यात GBS चा वाढता आलेख

पुण्यात GBS चा वाढता आलेख 

पुण्यात GBS चे एकूण 170 संशयित रुग्ण 

यापैकी 33 पुणे पालिका हद्दीतील तर 86 रुग्ण पुणे उपनगरातील. पिंपरी चिंचवड मधील 20 रुग्ण आणि 21 रुग्ण पुणे ग्रामीण मधील तर 8 रुग्ण इतर जिल्ह्यातील

पुण्यात 62 रुग्ण ICU मध्ये तर 20 रुग्ण व्हेंटिलेटर वर 

 

GBS मुळे आत्तापर्यंत 5 रुग्णांचा मृत्यू

Advertisement
Feb 06, 2025 10:11 (IST)

Live Update : पुणे शहरात अनेक ठिकाणी आज पाणीपुरवठा बंद

पुणे शहरात अनेक ठिकाणी आज पाणीपुरवठा बंद 

शहरातील मुख्य भागांमध्ये आज दिवसभर पाणीपुरवठा राहणार बंद 

शहरात अनेक ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी शहरात पाणीपुरवठा बंद 

तर 7 फेब्रुवारीला उशिराने येणार पाणी 

पुण्यातील कात्रज परिसर, सहकारनगर परिसर ,बिबवेवाडी आणि सातारा रस्त्यावर असणाऱ्या काही भागांमध्ये पाणी पूर्वठा बंद

Feb 06, 2025 09:26 (IST)

Live Update : संजीवराजे निंबाळकर यांची आज देखील चौकशी सुरूच

संजीवराजे निंबाळकर यांची आज देखील चौकशी सुरूच 

पुण्यात आज सलग दुसऱ्या दिवशी संजीवराजे निंबाळकर यांच्या घरी इनकम टॅक्स अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू 

संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर आणि गोविंद दूध डेअरी बाबत चौकशी सुरू

एकाचवेळी पुणे, फलटण येथील निवासस्थानी ही छापेमारी करण्यात आली आहे 

विविध ठिकाणचे आर्थिक व्यवहार याबाबत चौकशी अधिकारी यांच्याकडून सुरू आहे

Advertisement
Feb 06, 2025 09:26 (IST)

Live Update : नाशिक मुंबई महामार्गाजवळील पांडवलेणी झुडपात आग, आगीत झाडं जळून खाक

मुंबई-आग्रा महामार्गा लगत आसलेल्या पांडव लेणी जवळील अंगण हॉटेल येथील सर्व्हिस रोडजवळ बुधवारी सायंकाळच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने बिडी सिगारेट फेकल्याने आग लागल्याची चर्चा, काही क्षणात या आगीने रौद्र रूप धारण केल्याने आकाशात आगीचे उंच उंच लोळ दिसू लागले, सदर प्रकार नाशिक मुंबई महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशी आणि स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ जवळच्या अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाच्या  कर्मचाऱ्यांनी वेळीच आग बुजवण्याची प्रयत्न केले मात्र या आगीत सुशोबित दिसणारे छोटे झाडे जळून खाक झाले आहे. तसेच काही छोट्या जीवांची देखील हानी झाली आसल्याच बोललं जातंय. 

Feb 06, 2025 08:10 (IST)

Live Update : नागपुरात कोंबड्यांमध्ये बर्ड फ्ल्यूची लागण

- नागपुरात कोंबड्यांमध्ये बर्ड फ्ल्यूची लागण, ताजबाग परिसरातील कोंबड्या मध्ये एच 5 एन 1 ची विषाणू आढळलाय

- भोपाळच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषद, राष्ट्रीय उच्च सुरक्षा संस्था आणि पुणे येथील रोग अन्वेषण विभागात याची खातर जमा झाली..

- प्रयोग शाळेचा अहवाल प्राप्त झाल्यावर जिल्हा प्रशासन सतर्क, ताजबागसह आसपासचे 1 किमी परिसर बाधित क्षेत्र म्हणूण घोषित करण्यात आले आहे.

- बाधित क्षेत्रातील कोंबडी, अंडे, पक्षीखाद्य विक्री, खरेदी, करण्यास पुढील 21 दिवस प्रतिबंध लावण्यात आले आहे.

Advertisement
Feb 06, 2025 07:59 (IST)

Live Update : पैशाचा तगादा असह्य झाल्याने 35 वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

पैशाचा तगादा असह्य झाल्याने धाराशिव मधील 35 वर्षीय तरुणाने राहत्या घरामध्ये गळफास घेत आत्महत्या केलीय. गणेश वाघमारे असं या तरुणाचे नाव असून त्याने हॉटेल कामासाठी पाच हजार रुपयांची उचल घेतली होती. गणेश हा कामावर गेला असता तेथील तिघांनी पैसे परत मागत जाती वाचक शिवीगाळ केली. आणि पोलीस केसची धमकी दिली या त्रासाला कंटाळून या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. यावरून तिघांविरोधात आनंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Feb 06, 2025 07:58 (IST)

Live Update : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रांकडून तरुणाला बेदम मारहाण

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संबंधित बातम्या का पाहतोस? असा जाब विचारत आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्राने धारूर मधील एका तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत अशोक मोहिते हा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर अंबाजोगाईतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Feb 06, 2025 07:22 (IST)

Live Update : मुंबईमध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या संधी, राज्याच्या विकासाचा वेग कायम राखण्यासाठी आराखडा महत्वाचा

विकसित भारत 2047 यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पथदर्शी कार्यक्रमास सुसंगत विकास आराखडा तयार करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही.आर. सुब्रह्मण्यम यांनी आज मुख्यमंत्री श्री फडणवीस यांची मेघदूत या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.