गाझियाबादमधून एक अत्यंत धक्कादायक आणि गुंतागुंतीचे प्रकरण समोर आले आहे. गाझियाबाद पोलिसांनी एका महिलेला तिच्या प्रियकरासह अटक केली आहे. या Post Graduate शिक्षण घेतलेल्या पत्नीने आपल्या पतीच्या हत्येचा कट रचला होता. विशेष म्हणजे, याआधी तिने दोन वेळा हत्येचा कट रचला होता, पण तो यशस्वी झाला नाही. मात्र, तिसऱ्या प्रयत्नात ती यशस्वी झाली. आरोपी पत्नी इतकी चाणाक्ष आहे की, तिने खंडणीसाठी अनेक लोकांवर खोटे बलात्काराचे गुन्हे दाखल केले होते.
आरोपी पूजा (पत्नी) उच्चशिक्षित असून तिचा प्रियकर आशीष फक्त सातवी पास आहे. पूजाने पती योगेशच्या हत्येचा कट रचला. ज्यात आशीषसोबत त्याचे मित्र चंद्रपाल आणि प्रवीण सामील होते. पूजाची ओळख सोशल मीडियावरून सुखदेवशी झाली होती. पण नंतर त्यांचा ब्रेकअप झाला. सुखदेवनेच पॅचअप करण्यासाठी पूजाचा नंबर आशीषला दिला. मात्र, आशीषने स्वतःचे प्रेमसंबंध पूजा सोबत जोडले होते.
नक्की वाचा - Viral video: ही अमेरिकन महिला म्हणते भारतात अजिबात जाऊ नका, कारण ऐकून धक्का बसेल
पण पूजा आणि आशीषचे लग्न झाले नाही. तिचे लग्न योगेश या तरूणाबरोबर 2013 मध्ये झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. आशीष आणि पूजाचे संबंध 3 वर्षांपासून होते. योगेशला याबद्दल माहिती होती. तो याला विरोध करत होता. पण पूजा योगेशकडे घटस्फोट (Divorce) मागत होती. पण तो त्यासाठी तयार नव्हता. त्यामुळेच पूजाने बिजनौर आणि नंतर साहिबाबादमध्ये योगशच्या हत्येचा कट रचला होता. मात्र, दोन्ही वेळी योगेश वाचला. अखेर 29 September रोजी पूजाने योगेशला फोन करून पिलखुवा येथे बोलावले. तिथे आशीष आणि इतरांनी धारदार शस्त्रांनी त्याची हत्या केली.
पूजा एवढी शातिर होती की ती सातत्याने पोलिसांना धमकावत होती. माझ्या नवऱ्याला शोधून काढा म्हणून ती पोलीसांवर दबाव वाढवत होती. जेणेकरून आपल्यावर संशय येणार नाही असा तिचा डाव होता. पोलीसांनाही तिच्यावर संशय आला नाही. पण जेव्हा पिलखुवा येथे योगशचा सांगाडा (Skeleton) सापडला, तेव्हा पूजा स्वतः त्याची ओळख पटवण्यासाठी गेली होती. तिने सांगाडा पासून हाच आपला नवरा असल्याचं सांगितलं. त्यावेळी पोलीसांना शंका आली. इतक्या वाईट स्थिती असलेला मृतदेह फक्त सांगाड्यावरून तिने कसा ओळखला असा प्रश्न पोलीसांना पडला. त्यांनी चौकशी केली अन् या हत्येचा उलगडा झाल. पोलिसांनी पूजा आणि आशीषला अटक केली आहे. तर चंद्रपाल आणि प्रवीण अजूनही फरार आहेत.