
Kristen Fisher : अमेरिकेच्या कोलोराडो स्प्रिंग्समध्ये क्रिस्टन फिशर या तरुणीचा जन्म झाला आहे. ही सध्या दिल्लीमध्ये राहते. दिल्लीत राहात असताना तिने तिच्या इंस्टाग्रामवर एक रील बनवली. ती रील “Don't Go to India” अशी आशयाची होती. ती रील प्रचंड व्हायरल झाली. शिवाय क्रिस्टन फिशर हीला ओळखही मिळली. हा रील तिने जवळपास जून महिन्याचत पोस्ट केला होता. त्याचा विषय पाहाता तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या रीलमध्ये ती भारतात जाऊ नका असे सांगत आहे. पण हे ती का सांगते हे ऐकल्यानंतर तुम्हाला ही धक्का बसेल. पण हा धक्का सुखद धक्का नक्कीच असेल.
भारतात का जाऊ नका हे सांगतान ती म्हणते, की भारताची मोहकता आणि जीवन बदलणारे अनुभव ती सांगते. चार वर्षांपूर्वी भारतात स्थलांतर केलेल्या क्रिस्टनने देशातील लोक, संस्कृती, खाद्यपदार्थ, इतिहास आणि अप्रतिम दृश्यांचा अनुभव आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. हे सर्व तुम्हाला बांधून ठेवतं. तुम्हाला भारत सोडवत नाही. तुम्ही भारताचे होवून जाता. त्यामुळे तुम्ही भारतात येऊ नका. नाही तर तुम्ही इथल्या संस्कृती, सौंदर्य, राहणीमान यात हरवून जाल. या मागे तिचा उद्देश चांगला आहे. तिची सांगण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. त्यामुळे तिचा हा व्हिडीओ अनेकांनी पाहीला आहे.
तिच्या या रीलला कमी वेळात तब्बल 1.8 मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहीले आहे. भारतीय तसेच परदेशी लोकांनी या रीलवर अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी स्वतःच्या भारतातील अनुभव शेअर ही केला आहे. क्रिस्टन सारखी भारताशी खोलवर नाते असलेल्यांनीही आपल्या प्रतिक्रीया या रीलवर दिल्या आहेत ते म्हणतात, भारताला भेट देऊ नका, कारण ते तुमचं जीवन कायमच बदलून टाकेल. तुम्ही अद्भुत लोकांना भेटाल, अप्रतिम अन्नाचा अनुभव घ्याल, शानदार दृश्ये पाहाल आणि समृद्ध संस्कृती आणि इतिहास अनुभवाल. एकदा भारताची ओळख झाली की, तुम्हाला कदाचित परत येवू वाटणार नाही.
क्रिस्टन ही अमेरिकन जीवन शैली ऐवजी भारतीय शैलीशी एकरूप झाली आहे. भारतात असणाऱ्या अनोख्या जीवनशैलीकडे ती आकर्षित झाली आहे. त्यामुळे ती तिचे अनुभव सांगत असते. ती आपल्या दैनंदिन जीवनाचे क्षण नेहमी सांगत असते. साडी नसणे, स्थानिक स्ट्रीट फूड खाणे, सण साजरे करणे आणि कुटुंबासोबत प्रवास करणे या तिच्या आवडीच्या गोष्टी होवून बसल्या आहेत. तसेच भारतीय लोकांसोबत तीने जवळीकही साधली आहे. उपलब्ध आरोग्य सुविधा, विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक आणि सोप्या डिजिटल पेमेंट सुविधांचे तिला कौतुक आहे.
नक्की वाचा - Bobby Deol: बॉबी देओलच्या लेकाने 12 वीनंतर सोडलं शिक्षण, त्यामागचं कारण ऐकून म्हणाल...
आर्थिक दृष्ट्या अमेरिकन डॉलर्समध्ये कमावणे आणि भारतीय रुपये खर्च करणे या माध्यमातून क्रिस्टनच्या कुटुंबाला आरामशीर जीवन जगता येत आहे. तिच्यासाठी तो मोठा फायदा आहे. तिचा अनुभव NRI, परदेशी नागरिक आणि प्रवाशांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. भारताती विवीधतेतून एकता ही गोष्ट तिला भावली आहे. भारतातील प्रत्येक भाग कसा वेगळा आणि तेवढाच सुंदर असल्याचं ती सांगते. एकाच देशात समुद्र, डोंगर, वाळवंट, बर्फ पाहायला मिळते. या गोष्टी कोणत्याही परदेशी पाहुण्याला आकर्षीत तर करतात पण त्यांना आपलं ही करतात असं ती सांगते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world